प्रेशर कुकरमध्ये तेल, तूप किवा बटर गरम करा. जिरे घाला. ते तडतडू द्या.
दालचिनीचे तुकडे, काळी मिरी घाला. काही सेकंद ढवळा.
बारीक चिरलेला कांदा घाला. थोडा लालसर होईपर्यंत शिजवा.
हिरवी मिरची, लसूण, किसलेले आले घालून कच्चा वास जाईपर्यंत शिजवा
टोमॅटो, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, चिरलेली पालक पाने, मीठ घाला. १ मिनिट ढवळा.
धुतलेली डाळ आणि २-३ कप पाणी घालून कुकरचे झाकण बंद करा. मध्यम आचेवर ३-४ शिट्ट्या शिजवा.
गॅस बंद करा. कुकरमधीलप्रेशर नैसर्गिकरित्या खाली येऊ द्या.
मिश्रणथंड झाल्यावर ब्लेंडरला लावून बारीक आणि पातळ प्युरी बनवा. हे सूप चाळणीतून चाळून घ्या.
राहिलेला गाळ टाकून द्या. सूप आपल्या आवडीनुसार घट्ट किवा पातळ करण्यासाठी सॉसपॅनमध्ये पाणी घालून ही प्युरी टाकून पुन्हा गरम करा. किंचित पातळ असावे.
ब्रेड क्रॉउटन्स, ताज्या क्रीमच्या डॉलपने सजवा.
गरम सर्व्ह करा.