Go Back

टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)

Sujata Hande-Parab
“टाकळ्याची सुक्की भाजी” किवा “टाकळ्याची पालेभाजी (रानभाजी)” ही महाराष्ट्रामधील एक आवडती भाजी आहे. एकतर या भाजीसाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो.  गरमागरम चपाती, डाळ भात किंवा रोटी सोबत याची चव अप्रतिम लागते.
टाकळ्याची पाने किवा भाजी ही रानभाजी म्हणून ओळखली जाते. ह्याला काही ठिकाणी तरोटा म्हणूनही ओळखले जाते. कुठल्याही प्रकारची शेती किवा ह्या पालेभाजीचे वेगळे असे उत्पादन घेतले जात नाही. ही भाजी बहुतांशी रानात किवा शेतात रुजून येते. पाऊस पडला की आपसूकची रुजनारी ही भाजी अत्यंत आवडीने गावाकडे खाल्ली जाते. आता तर ही भाजी शहरात ही मिळू लागली आहे.
Prep Time 20 minutes
Cook Time 15 minutes
Course Side Dish
Cuisine Indian
Servings 4 people

Equipment

  • १ कढई/नॉनस्टिक पॅन

Ingredients
  

  • 2 जुडया टाकळ्याची जुडी किवा किवा १ १/२ कप (बारीक कापून घेतलेला)
  • १ १/२ मध्यम कांदा बारीक चिरून किवा १ कप
  • ५ ते ६ लसूण पाकळ्या सोलून आणि ठेचून
  • २-३ हिरवी मिरची चिरून आपल्या अवडिनुसार कमी जास्त कराव्यात.
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ - चवीनुसार
  • टेबलस्पून किसलेला नारळ किंवा भाजून ठेचलेले शेंगदाणे - २ टेबलस्पून

Instructions
 

  • टाकळ्याची भाजी व्यवसतिथ साफ करून घ्या. साफ करतानाफक्त पानेच घ्यावीत. भाजी ही कोवळी असावी. कोवळी पाने ही लाइट हिरव्या रंगाची आणि छोटी असतात. जून असलेला टाकळा हा घेऊ नये.
  • पाने वाहत्या पाण्याखाली तीनदा धुऊन घ्या.  अतिरिक्त पाणी काढून टाका.
  • टाकळ्याची पाने बारीक चिरून घ्या.  एकदमकोवळी आणि छोटी पाने असतील तर नाही चिरली तरी चालतात.
  • नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा.
  • बारीक चिरलेला कांदा, मीठ घाला. कांदा थोडा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • ठेचलेला किवा कापलेला लसूण, हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत भाजून घ्या.
  • टाकळ्याची पाने घाला. नीट ढवळून घ्यावे आणि ८ ते १० मिनिटे शिजवून घ्या. भाजी जर कोवळी असेल तर तर लवकर शिजते. झाकण लावू नका अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणारनाही.
  • ताजे किसलेले खोबरे घाला. चांगले मिसळा.
  • चपाती किंवा डाळ-भातासोबत गरमा-गरम सर्व्ह करा.

Notes

  • पाने कोवळी असतील तर ती पटकन शिजतात.
  • भाजी शिजताना झाकण लावून नये अन्यथा तिचा रंग बदलेल आणि हिरवा रंग राहणार नाही. परंतु शिजवताना ती सारखी परतत राहावी जेणेकरून ती कढईला चिकटणार नाही.
  • टाकळ्याची पाने साफ करणे हे महत्त्वाचे आहे. फक्त पानेच घ्यावीत किवा एकदम कोवळी दांडी असे पर्यन्त भाजी साफ करून घ्यावी.
  • माती वैगरे असल्या कारणाने वाहत्या पाण्याखाली किमान ३ वेळा पाने स्वच्छ धूऊन घेणे आवश्यक आहे.
Keyword bhaji, indian side dish, quick, टाकळा, पालेभाजी, रानभाजी