प्रथम कढईत तेल गरम करून घ्यावे.
त्यात जिरे मोहरी घालून त्यांना तडतडू द्यावे.नंतर त्यात कडीपत्ता पाने घालून परतून घ्यावे.
कांदा घालून तो लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.हिरवी मिरची, आले आणि लसूण जाडसर वाटून घ्यावे.
ही हिरवी पेस्ट कढईत टाकावी आणि कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यावे.
गरम मसाला टाकावा आणि परतून घ्यावा. आच मंद असावी.
कोथिंबीर टाकावी आणि परतून घ्यावा.
बेसन टाकावे आणि गॅसची आच कमी करून व्यवसतिथ एकजीव करून सारखे परतून 5 -8 मिनिटे भाजून घावे.बेसन भाजले की एक विशीष्ट असा सुगंध येऊ लागतो.
नंतर त्यात पाणी हळू हळू घालावे आणि बेसन परतत राहावे. आंच कमीच ठेवावी.
मी ह्यात १/४ कप आणि २ टेबलस्पून पाणी वापरले आहे.
झुणका करत असताना भांड्याला लागण्याची शक्यता असते. म्हणून तो सारखा परतत जर झुणका जास्त सुका वाटत असेल तर आणखीन २ ते ३ टेबलस्पून पाणी घालून आपल्याला जसा सुका किवा थोडा ओला झुणका हवा असेल तसा करावा.
गरम गरम झुणका भाकरी किवा चपाती बरोबर सेर्व करावा.