झटपट मसालेदार टोमॅटो भाजी
Sujata Hande-Parab
टोमॅटोची भाजी किवा काही ठिकाणी त्याला चटणी म्हटले जाते ती रेसिपी मी दाखवलेली आहे. अतिशय सोपी, कमी घटक लागणारी आणि पटकन होणारी अशी ही भाजी अतिशय अप्रतिम लागते. ही भाजी वेगवेगळ्या ठिकाणी काही पदार्थ कमी जास्त करून बनवली जाते. काही ठिकाणी ह्यात गूळ किवा साखर वापरली जाते. महाराष्ट्रात ही तिखट बनवली जाते.
Prep Time 15 minutes mins
Cook Time 15 minutes mins
Total Time 30 minutes mins
Course Main Course, Side Dish
Cuisine Indian
- ४ मोठे टोमॅटो बारीक चिरून
- १ मोठा किंवा २ मध्यम बारीक चिरलेला कांदा
- १/२ टीस्पून जिरे
- १ टीस्पून मोहरी
- ६-७ कढीपत्ता
- १ १/२ टीस्पून लसूण सोलून बारीक कापून घेतलेला
- २-३ हिरवी मिरची चिरून
- १ टीस्पून गरम मसाला
- १ १/२ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून हळद
- १ टीस्पून धनिया पावडर
- १ १/२ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे कूट – १ १/२
- २-३ टेबलस्पून कोथिंबीरबारीक चिरून
- चवीनुसार मीठ
- २ तेल - २ टेबलस्पून तेल
नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा.
जिरे, मोहरी घाला. ते तडतडू द्या.
कढीपत्ता घाला आणि परतून घ्या.
लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची घाला. कच्चा वास निघेपर्यंत शिजवा.
आता बारीक चिरलेला कांदा आणि मीठ घाला. कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्या.
बारीक चिरलेला टोमॅटो घाला. चांगले मिसळा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.
सर्व कोरडे मसाले, हळद, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, धणे पूड घाला. नीट मिक्स करून १-२ मिनिटे शिजू द्या.
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला. चांगले मिसळा.
वरुन कापलेली कोथिंबीरीची पाने घाला आणि भाजी ढवळून; चपाती, नान किंवा डाळ-भातासोबत गरमागरम सर्व्ह करा.
- टोमॅटो ताजे आणि कडक, पिकलेले असावेत.
- शेंगदाण्याचा कूट सगळीकडेच वापरत नाहीत. तो पर्यायी आहे.
- तिखट प्रमाण आपल्या आवडी नुसार कमी जास्त करावे.
Keyword healthy, quick, side dish, spicy, tomato, Vegetarian, टोमॅटो, भाजी