झटपट बेसन बुंदी
Sujata Hande-Parab
बूंदी ही एक लोकप्रिय डिश आहे. बूंदी करण्याची पद्धत एकाच आहे पण ती सर्व्ह करताना खूप सार्या प्रकारे करता येते. गोड, तिखट, चटपटीत, पाणीपुरी किवा रायत्या मध्ये ही ह्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. बूंदीचे लाडू तर सर्राश केले आणि खाल्ले जातात.
Prep Time 10 minutes mins
Cook Time 20 minutes mins
Total Time 30 minutes mins
Course Snack
Cuisine Indian
- १ कप बेसन/ चण्याचे पीठ
- १ १/२ टेबलस्पून तांदळाचे पीठ
- १/४ टीस्पून बेकिंग सोडा
- १ टीस्पून हळद
- चवीनुसार मीठ
- १ टेस्पून. + २-३ कप तेल - तळण्यासाठी
- १/२ कप पाणी
- सर्व्ह करण्यासाठी - चवीनुसार शेव किंवा चाटमसाला, लाल तिखट
एका भांड्यात बेसन, मीठ, हळद, बेकिंग सोडा घ्या. चांगले मिसळा.
१ टेबलस्पून तेल घाला. मिक्स करा.
एकावेळी हळूहळू पाणी घाला आणि जाडसर पिठ तयार करा. चांगले फेटून घ्या. ते अगदी स्मूद आणि त्यात कुठेही बेसनचे गोळे नसले पाहिजेत.
कढईत तेल गरम करा. तेल एकदम गरम असू नये नाहीतर बूंदी करपून जाईल.
छिद्रयुक्त चमचा किंवा झरणी घ्या. तेलाच्या वर ठेवा. त्याच्या मधोमध बेसनाचे तयार केलेले पीठ घाला.
एका दुसर्या डावाने किवा लैडल ने गोलाकार रीतीने ते फिरवून घ्या. अशा रीतीने ते पीठ झारणी च्या छोट्या होल मधून जाऊन बेसनाच्या पिठाचे छोटे छोटेगोलगोळे किंवा बुंदी तयार होतील.
मध्ये मध्ये झार्याला मागची बाजू साफ किवा स्पाचुलाने स्क्रॅप करून घ्या.
बुंदी मध्यम मंद आचेवर सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
स्लॉटेड स्पून वापरून तेलातून बाहेर काढा आणि १० सेकंड ते तेल निथळत ठेवा.त्यानंतर किचन टॉवेलवर काढून घ्या.
ही पद्धत वापरुन उर्वरित पिठाची बुंदी बनवून घ्या.
आपल्या चवीनुसार किवा आवडीनुसार खारीबुंदी किवा मसाला बुंदी किवा शेव-बूंदी म्हणून सर्व्ह करा
- पाणी टाकून पीठ बनवताना त्यात कुठेही लंप्स किवा बेसनाचे गोळे राहणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
- पिठाची कनसिसस्टंसी ही जास्त पातळ किवा घट्ट नसली पाहिजे.
- बूंदी बनवण्यासाठी होल असणारा चमचा ज्याला झारा किवा कलची म्हणतात अशा चमच्याचा वापर केला जातो.
Keyword Diwali, festival, Fried, gramflour, quick