झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसे
Sujata Hande-Parab
“झटपट बाजरी (पर्ल मिलेट) क्रेप किंवा डोसे” या रेसिपीमध्ये मी बाजरीचे पीठ आणि वाटलेले ताजे खोबरे वापरले आहे. या रेसिपी मध्ये किण्वन किवा ज्याला पीठ आंबवून घेणे असे म्हटले जाते हे आवश्यक नाही. अतिशय झटपट अशी ही पाककृती आहे. हे चवीला अप्रतिम लागतात आणि टोमॅटो किंवा नारळाची चटणी किंवा कोणत्याही करीसोबत छान लागतात.
Prep Time 30 minutes mins
Cook Time 10 minutes mins
Total Time 40 minutes mins
Course Breakfast
Cuisine Fusion, Indian
- २ कप बाजरी पीठ
- 3/४ -१ कप ताजा नारळ – (किसलेले आणि वाटलेले)
- १ ३/४ – २ कप पाणी – मिश्रणासाठी
- तेल - १ चमचे पिठात + ३-४ चमचे. पॅन ग्रीसिंग साठी
- चवीनुसार मीठ
सर्व्हिंग
- टोमॅटो चटणी किंवा लाल मिरची चटणी.
एका मोठ्या खोल भांड्यात पर्ल बाजरी / बाजरीचे पीठ, वाटलेला नारळ, मीठ आणि एक चमचा तेल घ्या.
हळूहळू पाणी घालावे. पाणी घालून चांगले ढवळून घ्या. मिश्रण फार जाड किंवा अतिशय पातळ असू नये.१५ ते २० मिनिटे झाकण लावून बाजूला ठेवा.
नॉनस्टीकपॅन वर तेल पसरवून घ्यावे. तेल पसरवताना ते रबर स्पॅटुला किंवा अर्ध्या कांद्याने सर्वत्र पसरवा. नंतर किचन टॉवेल वापरून पुसून टाका.
एका गोल चमच्याने, बनवलेले मिश्रण व्यवस्तिथ गोलाकार रितीने पॅनवर पसरवून घ्या. हे करताना फ्लेम मध्यम-मोठी असावी. नंतर ती मध्यम-कमी करावी.
७ते ८ सेकंद पॅनवर ताट ठेवावे. ताट काढून घ्या आणि डोसे पॅनच्या कडासोडू लागल्यावर परतून घ्या. वर थोडे तेल शिंपडा आणि दुसऱ्या बाजूने भाजून घ्या.
नारळ चटणी किंवा मसालेदार टोमॅटो चटणी बरोबर किंवा चहा, कॉफी बरोबर सर्व्ह करा.
- जाड तळ किवा बॉटम कास्ट आयर्न तवा किवा नॉनस्टिक पॅन वापरा.
- पिठात जास्त पाणी घालू नका अन्यथा डोसे किवा घावणे पॅनला चिकटून राहतील आणि नीट पलटणार नाहीत.
- जास्तीचे तेल, पाणी जर तव्यावर असेल तर ते पेपर टॉवेलने पुसून टाका.
Keyword Bajara, bread, Indian Breakfast, Main Course, Pearl Millet, quick, Snacks, घावन, डोसा, बाजरी