Go Back

झटपट पनीर भुर्जी

Sujata Hande-Parab
“पनीर भुर्जी” ही पाककृती उत्तरेकडे मोठ्या प्रमाणावर केली जाते. पनीर भुर्जी हा एक वेज भुर्जीचा प्रकार आहे.
महाराष्ट्रात अंडा भुर्जी हा प्रकार खूप प्रचलित आहे. परंतु सगळेच मासाहारि किवा नोन-वेज खाणारे नसल्यामुळे शाकाहारी भुर्जीचे बरेच प्रकार आपल्याकडे ही बनवले जातात.
पूर्वीपनीर हा प्रकार महाराष्ट्रात फार कमी बनवला आणि खाल्ला जात असे. गावाकडे अजूनहीह्याचा वापर फार कमी किवा केला जातच नाही. शहरी भागात जसे पुणे मुंबई कडे ह्याचेविविध प्रकारे सेवन केले जाते.
Prep Time 12 minutes
Cook Time 10 minutes
Total Time 21 minutes
Course Main Course
Cuisine Indian
Servings 4 people

Equipment

  • १ कढई/नॉनस्टिक पॅन

Ingredients
  

  • २०० ग्राम्स पनीर (कुठलाही ब्रॅंडचे वापरले तरी चालते. घरी केलेले असेल तर उत्तमच. किसून घेतलेले.)
  • कप कांदा बारीक चिरलेला
  • १/२ – ३/४ कप टोमॅटो बारीक चिरलेला
  • ३ ते ४ टीस्पून जिरे
  • १/२ टीस्पून मोहरी
  • ५ ते ६ कडीपत्ता पाने
  • ४ ते ५ लसूण पाकळ्या (सोलून आणि कापून किवा वाटून घेतलेल्या)
  • १/२ टेबलस्पून आले किसून घेतलेले
  • १/४ टीस्पून हळद
  • टीस्पून लाल मसाला
  • १/२ टीस्पून गरम मसाला
  • १/२ टीस्पून जिरा पाऊडर
  • २-३ टेबलस्पून कोथिंबीरची पाने बारीक कापलेली
  • १/२ टीस्पून कसूरी मेथी (भाजीत घालताना दोन्ही हातांच्या तळव्यात घेवून कुस्करूनघालावी.)
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ चवीनुसार

Instructions
 

  • कढईत किवा नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. जिरे आणि मोहरी घाला. त्याला तडतडू द्या.
  • त्यात कडीपत्ता घालून परतून घ्या.
  • कापलेली लसूण आणि आले घालून, कच्चा वास जाईपर्यंत तेलात परतून घ्या.
  • हिरवी मिरची आणि कांदा घालून तेलात लालसर,गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात मीठ, लाल मसाला, जिरा पाऊडर, हळद घालून परतून घ्या.
  • ३/४ भाग कोथिंबीर आणि टोमॅटो घालून मिक्स करून घ्या.
  • कढईवर ताट ठेवून टोमॅटो चांगला ३ ते ४ मिनिटे शिजू द्या. गॅसची आच कमी ठेवा. मधून मधून परतत रहा जेणेकरून कांदा-टोमॅटो करपणार नाही.
  • नंतर ताट काढून किसलेले पनीर घालून चांगल्या रीतीने मिक्स करून घ्या.
  • गरम मसाला टाकून परतून घ्या. 
  • कसूरी मेथी कुस्करून भाजीत टाका.  झाकण लावून २ -३  मिनिटे भूर्जी चांगली शिजू द्या.
  • फ्लेम बंद करा आणि राहिलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
  • चपाती, फुलका किवा डाळ-भाताबरोबर सर्व करा.

Notes

  • पनीर ताजे असावे. वास येणारे, पिवळे नसावे.
  • लाल मसाला किवा मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त करावे.
Keyword Bhurji, Cottage Cheese, paneer, quick, पनीर, भुर्जी