Go Back

ज्वारी भाकरी (Great Millet)

Sujata Hande-Parab
सोरघम, ग्रेटमिलेट किवा ज्वारी ही महाराष्ट्रात खूप प्रमाणात पिकवली जाते.
ह्यात खनिजे, कॅल्शियमव प्रथिने असतात. ह्याचे सेवन शरीराला आरोग्यदायी आणि फायदेशीर ठरते. ग्लुटेन फ्री असल्यामुळे ग्लुकोजसंवेदनशीलता असणाऱ्या लोकांसाठी हा एक सुरक्षित आणि पौष्टिक पर्याय ठरतो.
Prep Time 30 minutes
10 minutes
Total Time 40 minutes
Course Main Course
Cuisine Indian
Servings 4 people

Ingredients
  

  • १ १/२ कप ज्वारी पीठ
  • १/२ टेबलस्पून  + १-२ टीस्पून तूप/तेल तव्याला लावण्यासाठी आणि सर्व्ह करण्यासाठी (पर्यायी)
  • चवीनुसार मीठ
  • कप पाणी
  • सर्व्ह करण्यासाठी -कोणतीही ग्रेव्ही किंवा करी

Instructions
 

  • पॅन किवा टोपात पाणी आणि मीठ घाला. एक उकळी आली की फ्लेम बंद करा.
  • ते पाणी हळू हळू ज्वारीच्या पीठत टाका. चमच्याने मिक्स करा.
  • नीट मिक्स करून लागत असेल तर थोडे थोडे गरम पाणी टाकून पीठ मळून घ्या. पीठ जास्त घट्ट किवा पातळही  नसावे
  • पीठ ६-७ समान भागांमध्येविभाजित करा. त्यांचे छोटे छोटे बॉल सारखे गोळे करून घ्या.
  • ज्वारीचे सुखे पीठ रोलिंग बोर्ड किवा पोळपाटावर लावून घ्या. गोळ्यांनाही सुखे पीठ लावून घ्या.
  • कणकेचा गोळ्याच्या(६-७” व्यास) भाकर्‍या करून घ्या.  बोटांच्या टोकांचा वापर करून त्यांना गोल गोल फिरवून भाकर्‍या बनवा. लाटण्याच्यावापर करून छोट्या छोट्या भाकर्‍या ही लाटता येतात.
  • नॉनस्टिक पॅनकिंवा लोखंडी तवा गरम करा.
  • त्यावर भाकरी ठेवा. वर हाताच्या बोटांनी थोडे पाणी लावा किंवा ब्रश ने पाणी लावून घ्या. वरुण भाकरी थोडी ड्राय झाली आणि थोडे थोडे बब्बल दिसेपर्यंत भाजू द्या. मध्यम मंद आचेवर शिजवा.
  • पलटी करा आणि काही सेकंद दुसर्‍या बाजूने ही भाजू द्या.
  • पुन्हा परतवून घ्या आणि दोन्ही बाजूंना हलके तपकिरी डाग दिसेपर्यंत शिजवा. शिजण्यासाठीस्पॅटुलाच्या मदतीने मध्ये दाबा किवा मलमलच्या कपड्याचा वापर करा.
  • भाकरी शिजली आणि फुगली की ती प्लेटमध्ये ठेवा.
  • कोणत्याही भाजी किंवा करीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Notes

  • तव्याला जर भाकरी चिकटत असेल तर तूप किवा तेल लावून घ्या आणि नंतर भाकरी टाका. 
  • आच मंद -मध्यम ठेवा. 
 
Keyword bhakri, gluten-free, healthy, indian bread, millet, quick, ग्लुटेन-फ्री, भाकरी, मिलेट