Go Back

चीज गार्लिक ब्रेड स्टिकस

Sujata Hande-Parab
अतिशय जलद आणि तयार ब्रेड पासून केलेल्या ब्रेडस्टीक खूपच टेस्टी लागतात. कधी कधी आपण सँडविच करताना कडा कापून टाकून देतो त्या ऐवजी आपण असा प्रकारे ब्रेड स्टिक तयार करू शकतो. किंवा तो ब्रेड बेक करून त्याचा चुरा आपण तळताना कव्हरिंग साठी वापरू शकतो. 
Prep Time 12 minutes
Cook Time 8 minutes
Total Time 20 minutes
Course Appetizer, Snack
Cuisine Fusion, Indian
Servings 4 People

Equipment

  • १ मायक्रोवेव/ ओटीजी

Ingredients
  

  • ४-५ ब्राउन ब्रेड - ( सरळ कापून तुकडे केलेले)
  • टीस्पून लसूण मिन्सड किंवा बारीक ठेचून घेतलेली  -
  • १/२-१ टीस्पून लाल मिरची जाडसर वाटलेली किंवा फ्लेक्स - टीस्पून
  • टीस्पून ओरेगॅनो - १ टीस्पून
  • टीस्पून बेसिल पाने सुकलेली - १ टीस्पून
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • मीठ एक छोटीसी चिमूटभर
  • ३-४ टेबलस्पून किसलेले चीज - (कोणतेही जे उपलब्ध असेल ते.)

Instructions
 

  • ओव्हन २०० डिग्री सेल्सिअस ला गरम करून घेणे.
  • ब्रेड चे उभे तुकडे करून घ्या.
  • बेसिल पाने, ओरेगॅनो ग्राइंडर ला लावून जाडसर वाटून घ्या.
  • एका छोट्या वाडग्यात तेल घेऊन त्यात जाडसर वाटलेली लसूण, बेसिल पाने, ओरेगॅनो, मीठ, तेल घेऊन एकत्र करावे.
  • चांगले मिक्स करून थोडावेळ झाकून बाजूला ठेवावे. जास्त मीठ वापरू नये. ब्रेडमध्ये आणि चीज मध्ये आधीच थोडे मीठ असते.
  • एका बेकिंग ट्रे मध्ये ब्रेड चे तुकडे ठेवून मसाले इन्फयुज्ड तेल त्यावर  व्यवस्तिथ लावून घ्यावे.
  • पूर्व गरम केलेल्या ओव्हन मध्ये ४-५ मिनिटे किंवा टॉप कुरकुरीत ब्राउन होई पर्यंत बेक करावे.
  • बाहेर काढून किसलेले चीज पसरवून परत ओव्हन मध्ये १-२ मिनिटांसाठी बेक करावे.
  • तापमान तेच ठेवावे. क्रीम चीज डीप किंवा टोमॅटो केचअप बरोबर सर्व्ह करावे.

Notes

  • ब्रेड स्टिक जास्त बेक किंवा भाजू नयेत. करपू शकतात. थोड्या वेळाने थंड झाल्यावर त्या आणखीन कडक होतात. 
  • तेल जास्त लावू नये.
  • तेला ऐवजी बटर किवा लोण्याचा वापर ही करता येतो. तेल ऑलिव ऑइल किवा कुठलेही वास नसनारे असावे.
Keyword bake, bread, fusion, kids, kids friendly, quick, फ्युजन, बेक, ब्रेड