पहिल्यांदा घोसाळी चमच्याने किवा सूरीने अलगद अगदी वर-वर सोलून घ्या. जास्त सोलण्याची गरज नाही.अगदी कोवळी असतील तर नाही सोलली तरी चालतात.
ती धूऊन, त्याचे देठ काढून टाकून त्याचे तुकडे करून घ्या.
नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. जिरे आणि मोहरी घाला. त्याला तडतडू द्या.
कढीपत्त्याची पाने आणि लसूण-आल्याची पेस्ट घाला. कच्चा वास दूर होईपर्यंत तेलात परतून घ्या.
बारीक चिरलेला कांदा घाला आणि पारदर्शक किवा गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
हळद, हिंग, लाल मसाला, मीठ आणि कापलेली कोथिंबीर घाला. काही सेकंद ढवळा.
चिरलेला टोमॅटो घालून एकजीव करून घ्या. वर ताट ठेवून टोमॅटो लगदा होईपर्यंत शिजवून घ्या.
ताट काढून कापलेली घोसाळी आणि बटाटे त्यात घाला आणि मसाल्यात व्यवस्थित कोट करून घ्या.
खोलगटताट पॅन किवा कढई वर ठेवून त्यावर पाणी घालून भाजी १०-१२ मिनिटे शिजवून घ्या.मध्ये मध्ये झाकण हळुवारपने काढून भाजी परतत रहा. गॅसची आच मंद ठेवा.
भाजीत पाणी टाकण्याची गरज भासत नाही कारण घोसाळयत नैसर्गिक पाणी असते त्यामध्येच भाजी चांगली शिजते.
नंतर ताट काढून भाजीत गरम मसाला आणि किसलेले खोबरे आणि राहिलेली कोथिंबीर घालून परतून घ्या.
परत खोलगट ताट ठेवून त्यावर पाणी ठेवून अजून २-४ मिनिटे भाजी शिजवून घ्या.
गावठी आणिलहान घोसाळी असतील तर शिजायला कमी वेळ लागतो. भाजी जास्त शिजवून लगदा करू नये नाहीतर त्याची चव चांगली लागत नाही.
गरम-गरम भाजी चपाती किंवा रोटी किंवा डाळ-भाता बरोबर सर्व्हकरा.