Go Back

खिमट किवा भाताची कांजी/पेज

Sujata Hande-Parab
खिमट, खिमटी, भाताची कांजी किवा पेज ह्या सारख्या नावांनी प्रचलित आहे.
अतिशय पोषक, आरोग्यदायी अशी ही पेज किवा खिमट महाराष्ट्रातच नाही तर भारतात सगळ्या ठिकाणी बनवले जाते. त्याचे नाव आणि बनववण्याची पद्धत थोड्याफार प्रमाणावर वेगळी असेल.
महाराष्ट्रातखिमट हे नाश्ता म्हणून ही खाल्ले जाते. भाताची लागवड कोकण भागात मोठ्या प्रमाणावरकेली जाते. भात/तांदूळ हे स्टेपल आहे आणि त्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर केले जातात.
Prep Time 5 minutes
Cook Time 20 minutes
Total Time 25 minutes
Course Breakfast, Main Course
Cuisine Indian
Servings 3 people

Equipment

  • १ प्रेशरकूकर

Ingredients
  

  • १/३ कप तांदूळ/गावठीतांदूळ किवा उकडा तांदूळ (५टेबलस्पून, १ टीस्पून)
  • ४ ते ५ कप पाणी
  • मीठ चवीनुसार

सेर्विंगसाठी

  • २ ते ३ टेबलस्पून तूप
  • लोणचे पर्यायी

Instructions
 

  • तांदूळ चांगले ७ ते ८ वेळा धुवून घ्यावेत. पांढरे पाणी निघुन जाईपर्यंत पाणी काढून टाकावे.
  • नंतर कूकर मध्ये ४ ते ५ कप पाणी घेवून,धुतलेले तांदूळ त्यात टाकावे.
  • कुकरचे झाकण लावून, गॅस ची आच मध्यम-कमी ठेवून ६ ते ७ शिट्ट्या होईपर्यंत तांदूळ शिजवून घ्यावा.
  • उकडा तांदूळ असेल तर ८ ते ९ शिट्ट्या द्याव्यात आणि फ्लेम कमीच ठेवावी.
  • कुकरची वाफ निघून गेली की १० ते १२ मिनिटांनी कुकर खोलावा. पेजेत बहुतांशी पाण्याचे प्रमाण जास्त असते. आपल्या आवडी प्रमाणे खीमट थोडे खिरी सारखे कमी पाणी ठेवून हीकरू शकतो.
  • मुलांना देताना पाणी कमीच असावे. खिमटी मधला भात थोडासा गोल चमच्याने माश करून घ्यावा.
  • सेर्वे करताना वाटीत किवा ताटात खिमट घेवून त्यात मीठ टाकावे. तूप टाकावे आणि गरमागरम सर्व करावे.

Notes

  • पेजेत बहुतांशी पाण्याचे प्रमाण जास्त असते. आपल्या आवडी प्रमाणे खीमट थोडे खिरी सारखे कमी पाणी ठेवून ही करू शकतो.
  • काही ठिकाणी पेजेतले पाणीच सर्व केले जाते. बहुतांशी कोणी आजारी असेल किवा लहान मुलांना पाणीच सर्व केले जाते.
  • मीठ सर्व करताना घालावे.
  • गॅसची आच मध्यम-कमी ठेवून ६ ते ७ शिट्ट्या होईपर्यंत तांदूळ शिजवून घ्यावा.
  • उकडा तांदूळ शिजायला वेळ लागतो त्यामुळे ८ ते ९ शिट्ट्या द्याव्यात आणि फ्लेम कमीच ठेवावी.
Keyword Indian Rice, kanji, khimat, pej, rice kanji, कांजी, खिमट, पेज