Go Back

कोबी मुठिया

Sujata Hande-Parab
मुठिया हे एक गुजराती खाद्यपदार्थ आहे. मुठीया म्हणजे मूठ दाबून तयार केलेले किवा आकार दिलेले.बेसिक मुठिया हे बेसन, रवा किवा गव्हाचे पीठ, मेथी, मसालेवापरुन तयार केले जाते.
मी ही रेसिपी वेगळ्या पद्धतीनेम्हणजेच मेथी ऐवजी कोबी वापरुन केली आहे. ह्या रेसिपीमध्ये काही मसाल्यांबरोबर बेसन, गव्हाचे पीठ, बारीक रवाळ वाटलेला कोबी वापरलेला आहे.
Prep Time 15 minutes
Cook Time 20 minutes
Total Time 35 minutes
Course Appetizer, Breakfast, Snack
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ स्टीमर किवा कूकर

Ingredients
  

  • कप बेसन
  • टेबलस्पून गहू पीठ
  • कप कोबी मिक्सर ला लावून रवाळ वाटून घेतलेला. पेस्ट नको (दाबून घेतलेला)
  • टिस्पून चिंचेची पेस्ट
  • १/२ टिस्पून हिंग
  • १/२ टिस्पून धणे पूड
  • १/२ टिस्पून जिरेपूड
  • १/४ टिस्पून हळद
  • टिस्पून लाल तिखट
  • टिस्पून किसलेला गूळ
  • टिस्पून ताजे आले जाडसर वाटलेले
  • हिरवी मिरची जाडसर वाटलेले
  • लसूण पाकळ्या जाडसर वाटलेले
  • चवीनुसार मीठ
  • तेल - फोडणी - २ टीस्पून + तळण्यासाठी १ टेबलस्पून
  • १/२ -१ टेबलस्पून पाणी (थोडे थोडे वापरावे)

फोडणीसाठी

  • ३-४ कढीपत्ता पाने
  • १/२ टेबलस्पून तीळ सफेद
  • १/२ टेबलस्पून जिरे
  • १/४ टीस्पून हिंग

Instructions
 

  • एका वाडग्यात बेसन, गव्हाचे पीठ, जीरे, धणे पूड, लाल मिरची पूड, हिंग, तेल, पांढरे तीळ, किसलेले गूळ, जाडसर वाटलेले ताजे आले आणि हिरवी मिरची, लसूण घ्या. चांगले मिक्स करा.
  • कोबीचेमिश्रण, मीठ घाला. चांगले मिक्स करून घ्या. 
  • एकावेळी थोडे थोडे पाणी घाला आणि मिश्रण तयार करा. हे थोडे चिकट होईल.
  • कणिक मळतो तसे एकत्र करून घ्या. जर पाणी लागत असेल तरच घाला
  • हातवर थोडे तेल किंवा पाणी लावून घ्या. मिश्रणाचे दोन लंबकार  (४-५ इंच लांब) गोळ्यांमध्ये  विभाजन करा. 
  • प्लेट वर थोडेसे तेल पसरवून घ्या आणि बनवलेले लॉग्स त्यावर ठेवा
  • स्टीमर किंवा कुकरमध्ये वाफवुन घ्या.  (प्रेशर कूकरचा वापर केल्यास, 3 शिट्ट्यासाठी शिजवा आणि स्टीमरमध्ये १८-२०मिनिटे ते शिजवावे.
  • गॅस बंद करा. कुकरच्या दाब सहजपणे खाली येऊ द्या
  • थंड होऊ द्या. दीड इंच जाड काप करून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करावे. कढीपत्ता पाने घाला. काही सेकंद ढवळा
  • जिरे, पांढरे तीळ, घालून त्यांना तडतडू द्या.  हिंग घाला. परतून घ्या.
  • कापलेल्या मुठिया किंवा वड्यां घाला आणि गोल्डन ब्राऊन, कुरकुरीत होईपर्यंत तळा.
  • चहा, कॉफ़ीसह गरम सर्व्ह करा.

Notes

  • जास्त  घट्ट गोळे बनवू नका. ते वाफवल्यावर एकदम कडक होतील.
  • जास्त वेळ वाफवू नका.
Keyword fusion, healthy, Indian Breakfast, quick, Shallow Fry, कोबी, फ्युजन, मुठिया