काजू चोको रॉक्स
Sujata Hande-Parab
चॉकलेटला सगळीकडे मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते,मग ते डार्क, दूध फ्लेवरअसो. ह्याचा वापर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर होतो. केक, आईसक्रीम, मिल्कशेक्स, फ्लेवडर्ड चोकोलेट्स असा विविध प्रकारच्या रेसिपीत ह्याचा वापर केला जातो.
Prep Time 10 minutes mins
Cook Time 5 minutes mins
Total Time 15 minutes mins
Course Dessert, Snack
Cuisine Continental
- १ कप काजू भाजलेले
- ७५ ग्राम डार्क चॉकोलेट
- १ टीस्पून कॉफी पूड
डार्क चॉकलेट चिरून घ्या. डबल बॉयलर पध्दत किंवा १ मिनिट मायक्रोवेव्ह मध्ये ते वितळवा. जर मायक्रोवेव्ह वापरात असाल तर प्रत्येक १० सेकंदानंतर तपासा. प्रत्येक कालावधी नंतर ढवळत राहावे. चॉकोलेट पूर्ण वितळेपर्यंत हे करा.
चॉकलेट गरम असताना कॉफी पावडर घाला. चांगले मिक्स करावे.
भाजलेले काजू चॉकलेट मिश्रणात घालावे. हळुवारपणे ढवळावे.
सिलिकॉन किंवा बेकिंग शीट घ्या. बटर पेपर ने कव्हर करा. काही काजूच्या चॉकलेट मिश्रणाचा क्लस्टर बेकिंग शीट वर घाला. त्यांच्या मध्ये जागा सोडा. एकदम चिकटून घालू नका.
क्लस्टर १० ते १५ मिनिटे सेट होऊ द्या.
सर्व्ह करा किंवा रैपर मध्ये कवर करून हवाबंद डब्यात साठवा.
- चोकोलेट वितळवताना पाणी लागू नये ह्याची काळजी घ्यावी.
- क्लस्टर घालताना बटर पेपर किवा सिलिकॉन शीट च वापरावी नाहीतर चोकोलेट क्लस्टर निघणार नाहीत. चिकटतील.
Keyword chocolate, dessert, fusion, kids, kids friendly