Go Back

कांदा पोहे

Sujata Hande-Parab
कांदा पोहे हि महाराष्ट्राची पारंपरिक डिश आहे. सकाळचीन्याहारी किंवा संध्याकाळचा स्नॅक्स पोहे हे सगळीकडे आवडीने खाल्ले जातात. पटकन होणारी आणि अतिशय पौष्टिकअशी हि डिश थोड्याश्या लिंबाच्या रसाने आणि शेव टाकून खूपच लज्जतदार लागते.
Prep Time 10 minutes
Cook Time 10 minutes
Total Time 20 minutes
Course Breakfast
Cuisine Indian
Servings 4 People

Ingredients
  

  • १ १/२ कप जाडा पोहा (पूर्णपणे धुऊन आणि गाळून, निथळून घ्यावे.)
  • १/२ टीस्पून मोहोरी
  • १/२  टीस्पून जिरे
  • ७-८   पाने कढीपत्ता
  • कांदा मोठा बारीक चिरून
  • २-३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  • २ -३ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर पाने
  • १/२ टीस्पून हळद पावडर
  • टेबलस्पून साखर
  • १ १/२ टेबलस्पून तेल
  • १ १/२ टेबलस्पून भाजलेले  शेंगदाणे किवा शेंगदाण्याचाजाड कूट
  • १/२ टेबलस्पून  ताजे किसलेले खोबरे (पर्यायी)
  • चवीनुसार मीठ
  • सर्व्हिंगसाठी - बारीक शेव्  लिंबू तुकडे , बारीक चिरलेला कांदा

Instructions
 

  • एक कढईत किंवा नॉनस्टिक पॅन मध्ये तेल गरम करून मोहरी आणि जिरे घाला. त्याला तडतडू द्या
  • कढीपत्ताआणि चिरलेला कांदा घालावा. लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पाने टाका. १५ ते २०  सेकंड परतून घ्या.
  • हळद,साखर घाला. साखर विरघळे पर्यंत चांगले मिक्स करावे.
  • धुतलेले आणि गाळून घेतलेले पोहे घाला. हलक्या हाताने मिक्स करावे किंवा ते टॉस करा
  • भाजलेले शेंगदाणे आणि किसलेला नारळ घाला. हलक्या हाताने मिक्स करावे.
  • कोणतीही मसालेदार किंवा फ्लेवर्स शेव् घाला.
  • लिंबू तुकडे आणि बारीक चिरलेला कांदा ही घालू शकतो.
  • चहा किंवा कॉफी बरोबर गरमा- गरम कांदा पोहे सर्व्ह करा

Notes

  • पोह्याचे मिश्रण अतिशय हळू ढवळा
  • नेहमी जाड पोहा वापरा.
  • जास्त भिजवून ठेवू नका नाहीतर पोह्यांचा लगदा होईल.
  • हिरवी मिरची आपल्या चवीनुसार कमी जास्त करू करू शकता.
Keyword breakfast, flattened rice, gluten-free, healthy, kids friendly, quick, Vegetarian, ग्लुटेन-फ्री, पोहे