एका छोट्या वाडग्यात मैदा घ्यावा. थोडे थोडेकरून तूप टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. तूप एकदम टाकू नये. बाजूला ठेवावे. (साटा किंवा लच्छा लेअर साठी )
एका पराती मध्ये मैदा, रवा, साखर, कुस्करलेली कसुरी मेथी, जाडसर वाटलेला ओवा, मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करावे.
पिठाच्या मधोमध होल करून त्यात गरम तुपाचे मोहन टाकावे .
चमच्याने चांगले मिक्स करून घ्यावे .
थोडे थंड झाल्यावर हळू हळू दोन्ही हातानी पीठ चांगले कुस्करून घ्यावे.
त्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ जाडसरअसावे.
मळलेल्या पिठाचे मध्यम आकाराचे समान गोळे बनवून घ्यावेत.
बनवलेल्या गोळ्याची एक एक करून समान आकाराची पोळी लाटून घ्यावी. पीठ जाडसर असल्यामुळे सुख्या पिठाची गरज लागत नाही
३ पोळ्या लाटून झाल्यावर एक पोळपाटावर ठेवावी. त्यावर बनवलेले मैदा - तूप मिश्रण व्यवस्तिथ एकसारखे १/२ इंच जागा ठेवून पसरवून घ्यावे.
दुसरी पोळी त्यावर ठेवावी. मैदा - तूप मिश्रण पसरवावे. अशी कृती तिन्ही पोळ्याना करावी.
झाल्यावर एका बाजूने व्यवस्तीत घट्ट रोल करण्यास सुरवात करावी. रोल करून झाल्यावर जर जास्त जाडा असेल तर अगदी थोडे दोन्ही बाजूनी तळहाताचा वापर करून रोल करावे किंवा ताणून घ्यावे. कडा हळुवार पने बंद कराव्यात.
धागा किंवा सूरीने समान १/४ -१/२ इंच कापूनघ्यावेत.
एका ताटात काढून घ्यावेत. एक कापलेला भाग किंवा लाटी पोळपाटावर घेऊन लाटणीने अगदी हळू थोडी २ इंच लाटून घ्यावी.
असा प्रकारे सगळ्या मटरीज करून घ्याव्यात.
एका कदाचीत तेल गरम करून कमी मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळुन घ्याव्यात.
आच शक्यतो मंदच ठेवावी. नाहीतर मटरीज करपण्याची शक्यता असते. अगदी नाजूक हातानी तळुन घ्यावीत.
किचेन टॉवेल वर काढून थंड झाल्यावर हवाबंद बरणीत भरून ठेवाव्यात.
चहा बरोबर सर्व्हे कराव्यात