Go Back

ओट्स रवा डोसा

Sujata Hande-Parab
ओट्स रवा डोसा हि एक अतिशय जलद होणारी हेलथी पाककृती आहे. थोडासा कुरकुरीत आणि जाळीदार असा हा डोसा चटणी बरोबर अतिशय उत्तम लागतो. हा डोसा करताना पाणी टाकताना आणि मिश्रणाची कॉन्सिस्टन्सी बरोबर असणे अतिशय आवश्यक आहे नाही तर डोसा जाड किंवा पातळ निघतो. जाळी पडत नाही. रवा ओट्स मिश्रण १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे आणि नंतरच डोसे करावेत.
Prep Time 20 minutes
Cook Time 10 minutes
Total Time 30 minutes
Course Breakfast, Snack
Cuisine Fusion, Indian
Servings 4 People

Equipment

  • १ पॅन

Ingredients
  

  • ३/४ कप ओट्स पीठ  - (ओट्स मिक्सर ला लावून त्याचे पीठ करून घेणे.)
  • १/४ कप रवा
  • ४-५ टेबलस्पून तांदळाचे पीठ 
  • १/४ कप दही (फेटून घेतलेले)
  • बारीक कापलेली हिरवी मिरची - (थोड्या कमी तिखट असणाऱ्या)
  • टेबलस्पून कोथिंबिरीची पाने बारीक कापून घेतलेली -
  • टीस्पून अद्रक- किसून घेतलेले
  • १/२ कांदा- एकदम बारीक चिरून घेतलेला
  • टीस्पून जिरे- टीस्पून
  • टीस्पून कालीमिरी पूड - टीस्पून
  • १/४ टीस्पून खाण्याचा सोडा किवा इनो मीठ (Eno fruit salt)
  • मीठ चवीनुसार 
  • १ + ३-४ टेबलस्पून तेल- डोसा मिश्रणामध्ये घालण्यासाठी + डोसा भाजण्यासाठी
  • १ १/२ - २ कप पाणी- किंवा जसे लागेल तसे. अतिघट्ट किंवा पातळ मिश्रण नको.

Instructions
 

  • एका मोठ्या टोपात किंवा वाडग्यात पाणी, खाण्याचा सोडा सोडून सगळे पदार्थ घ्यावेत. चांगले मिक्स करून घ्यावेत.
  • पाणी हळू हळू टाकून मिश्रण व्यवस्तिथ जास्त घट्ट किंवा अति पातळ नसेल असे करावे. १०-१५ मिनिटे बाजूला झाकून ठेवावे. जेणेकरून रवा थोडासा फुगतो.
  • खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घ्यावे.
  • एका नॉनस्टिक पॅनला तेल लावून घ्यावे.
  • त्यावर बनवलेले मिश्रण थोडे घालून पाहावे. आच जास्त-माध्यम असावी. मिश्रण टाकताना व्यवस्तिथ तव्यावर पडले पाहिजे आणि त्याला छान जाळी  आली पाहिजे तर ते मिश्रण डोसे करण्या योग्य समजावे.
  • जर मिश्रण पाहिजे तसे झाले असेल तर एका खोलगट चमच्याने  ते व्यवस्तिथ गोलाकार तापलेल्या तव्यावर किंवा पॅनवर टाकावे. १०-१५ सेकंदासाठी झाकण ठेवावे. झाकण काढून थोडा वेळ भाजू द्यावे.
  • जेव्ह डोशाच्या बाजू सुटू लागतील त्या वेळेस तो परतून घ्यावा. दुसऱ्या बाजूने हि व्यवस्तिथ ब्राउन आणि थोडा कुरकुरीत होईपर्यंत  भाजावा.
  • चटणी बरोबर सर्व्ह करावा किंवा टिफिन मध्ये भरून द्यावा.

Notes

  • चुकून जास्त पाणी पडल्यास तांदळाचे पीठ आणि थोडा रवा घालावा
  • मिश्रण टाकताना व्यवस्तिथ तव्यावर पडले पाहिजे आणि त्याला छान जाळी आली पाहिजे तर ते मिश्रण डोसे करण्यायोग्य समजावे.
Keyword dosa, kids friendly, Kids Tiffin, oats, quick, Semolina, ओट्स, डोसा, रवा