ओट्स गव्हाची रोटी
Sujata Hande-Parab
“ओट्स गव्हाची रोटी” ह्या रेसिपीत मी ओट्स चे पीठ आणि गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे. खाण्यास अतिशय पौस्टिक अश्या ह्या रोटीज अतिशय कमी वेळेत बनतात. ज्यांना वजन कमी करायचे असेक किवा डायट वर असतील अश्याना तर ह्या रोटीज आवश्य खाल्ल्या पाहिजेत.
Prep Time 20 minutes mins
Cook Time 10 minutes mins
Total Time 30 minutes mins
Course Main Course
Cuisine Fusion, Indian
- १ १/२ कप ओट्स पीठ - १ १/२ कप (ओट्स मिक्सरला लावून पीठ करून घ्यावे.)
- १/२ कप गहू पीठ – १/२ कप
- २ टेबलस्पून तूप /तेल – (रोटीला लावण्यासाठी)
- चवीनुसार मीठ
- १ १/२ कप साधे पाणी – किंवा लागेल तसे. पाणी एकदम घालू नये.
एका परातीत ओट्स आणि गहू पीठ घेऊन त्यात थोडे मीठ टाकावे. व्यवसतिथ मिक्स करून त्यात हळू हळू पाणी टाकून पीठ मळून घ्यावे.
पीठ मळून झाल्यावर ते झाकून १५ ते २० मिनिटे ठेवावे.
कणकेचे ८-१० समान गोळे करा.
एक गोळा घेऊन तो हाताने थोडा दाबून घ्या.
पोळपाटाला आणि बनवलेल्या रोटीच्या गोळ्याला थोडेसे गव्हाचे सुके पीठ लावून घ्या.
हळू हळू सगळ्या बाजूनी लाटून (४-५ इंच व्यास) चपाती/रोटी सारखा गोल आकार द्या. लागत असल्यास सुख्या पिठाचा वापर करा आणि रोटी थापून घ्या.
आधीच गरम केलेल्या लोखंडी तव्यावर किंवा पॅनवर अलगद टाका.
वर बुडबुडे दिसू लागताच ती परतूनघ्या. मध्यम आचेवर भाजून घ्या. परतून घ्या आणि काहीसेकंद भाजू द्या. पुन्हा परता आणि दोन्ही बाजूनी व्यवस्तिथ भाजून घ्या.
एखादा स्वच्छ कपडा किंवा पलिता वापरून रोटीच्या कडा दाबून तिला व्यवस्तिथ फुगू द्या. त्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून घ्या.
रोटी फुगली की ताटात काढून गरमा-गरम सर्व्ह करा.
- कणिक मळताना पाण्याची गरज लागत असल्यास पाणी टाकावे. किंवा पीठ जास्त नरम वाटत असल्यास अधिक पीठ वापरावे.
- ओट्सचे पीठ मळताना ते चिकट लागते.
- पीठ मळून थोडा वेळ ठेवल्यानंतर ते परत घट्ट होते. लागत असल्यास पाण्याचा वापर करून परत मळावे.
- ह्या रोटीज जास्त वेळ राहिल्या तर कडक होतात म्हणून ताज्या करूनच खाव्यात.
Keyword bread, chapati, fusion, healthy, indian bread, quick, Roti, ओट्स, चपाती, फ्युजन, रोटी