Go Back

उपवासाची केळ्याची भाजी

Sujata Hande-Parab
उपवासाच्या बटाट्याच्या भाजी प्रमाणेच हि केळ्यांची भाजी  केली जाते. खाण्यास अतिशय स्वादिष्ट आणि हेलथी हि आहे. फराळी पुरी बरोबर किंवा वारी तिचे करी बरोबर खालली जाते. केळी चांगली उकडून शिजवून घ्यावीत. कुकरला ३-४ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यावीत.
Prep Time 10 minutes
Cook Time 20 minutes
3 minutes
Total Time 33 minutes
Course Main Course, Side Dish, Snack
Cuisine Indian
Servings 2 People

Equipment

  • १ प्रेशर कूकर

Ingredients
  

  • मध्यम  कच्ची केळी (कुकरला उकडलेली ,सालेकडून छोट्या तुकड्यात कापलेली )
  • १/२ -१ टीस्पून  जिरे
  • २-३ टेबलस्पून भाजलेले शेंगदाणे भरड काडून घेतलेले
  • १   टीस्पून लिंबाचा रस
  • सैंधव मीठ - चवीनुसार 
  • टेबलस्पून तेल - १ टेबलस्पून 

हिरवी जाडसर चटणी किंवा भरड

  • १ १/२ टेबलस्पून ताजे आले
  • २-३ हिरवी मिरची
  • १/४ कप किसलेले ओले खोबरे
  • टीस्पून भाजलेले जिरे

Instructions
 

  • एका नॉनस्टिक कढई मध्ये तेल गरम करून घ्या. जिरे घाला आणि तडतडू द्या. 
  • आता बनवलेली पेस्ट किंवा भरड  घालून चांगले परतून घ्या. 
  • उकडून कापलेले केळ्यांचे छोटे तुकडे, भाजलेले शेंगदाणे भरड, मीठ, आणि लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या.
  • गरमागरम सर्व्ह करा. 

Notes

  • केळी जास्त शिजवू नयेत.
  • भाजी करताना जर जास्त ड्राय किवा सुकी वाटत असेल तर पाण्याचा हबका मारावा.
  • केळी ताजी, हिरवी आणि कडक असावीत.
Keyword fasting, indian bread, indian,, raw banana, उपवास, फराळी