अंडी व्यवसतिथ उकडून घ्यावीत. सोलून घ्यावीत आणि त्याचे दोन भाग कापून पिवळा भाग वेगळा करावा.
सफेद भागाचे छोटे टुकडे कापून ते वेगळे ठेवावेत आणि पिवळ्या भागाचेही ही ४ ते ५ तुकडे कापून बाजूला ठेवावेत.
नॉनस्टीक पॅनमध्ये तेल गरम करा. जिरे आणि मोहरी घाला. त्याला तडतडू द्या.
बारीक चिरलेला कांदा, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कापून घेतलेल्या लसणीच्या पाकळ्या घाला.
कच्चा वास दूर होईपर्यंत आणि कांदा पारदर्शक किवा लालसर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
हळद, लाल मसाला घालावे.काही सेकंद ढवळा.
नंतर चिरलेला टोमॅटो घालावा आणि परतून घ्यावा. त्यात चिरलेली कोथिंबीर टाकून परतून घ्या
पॅन वर ताट ठेवून टोमॅटो चांगला मैश होईपर्यंत शिजवून घ्या.
नंतर त्यात गरम मसालाआणि कापलेल्या सफेद अंड्याचा भाग टाकून हळू-हळू परतून घ्या.
ताट ठेवून १ -२ मिनिटे शिजवून घ्या.
सगळ्यात शेवटी पिवळाभाग टाकून परतून घ्या. ढवळताना सावकाश ढवळा.
गॅसची आच बंद करून गरमा-गरम पोळी, डाळ किवा करी-भात बरोबर सर्व करा.