Go Back

आले गुळाचा चहा

Sujata Hande-Parab
“आले गुळाचा चहा” हे एक आरोग्यदायी आणि सुगंधित पेय आहे जे आम्ही आपल्या घरी नियमितपणे बनवतो.
आले ही एक वनस्पति आहे. जिचे मूळ ज्याला आपण आले किवा अद्रक म्हणतो. आल्याला एक विशिष्ट असा सुगंध असतो त्यामुळे ते ज्या पदार्था मध्ये वापरले जाते तो पदार्था ही अतिसय सुगंधी आणि ताजा लागतो. आले हे बहुतांशी मसाल्यांमध्ये वापरले जाते. भारतामध्ये आल्याचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. औषधानमध्ये ही ह्याचा वापर केला जातो.
Prep Time 5 minutes
Cook Time 17 minutes
Total Time 22 minutes
Course Drinks
Cuisine Indian
Servings 4 People

Equipment

  • १ केटल किवा पातेले

Ingredients
  

  • १/२  इंच किंवा १ १/२ टीस्पून ताजे आले बारीक चिरून
  • २ ते ३ टेबलस्पून किसलेला गूळ- (आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा)
  • टीस्पून चहा पावडर
  • १/२ – ३/४   कप दूध
  • कप पाणी

Instructions
 

  • आले नीट धुवा. बारीक वाटून घ्या किंवा बारीक तुकडे करा. सोलून घेणे हे पर्यायी आहे.
  • केटलमध्ये पाणी गरम करा. आले घालावे. मंद- मध्यम आचेवर ८-९ मिनिटे मिश्रण उकळवा.
  • चहा पावडर घालून मंद आणखी आचेवर ५मिनिटे उकळू द्या.
  • कोमट दूध घालून चहा आणखीन ४-५ मिनटे उकळी येऊ द्या. पातेल्याच्या कडांना लागलेली चहा पाऊडर चमच्याने काढून चहात मिक्स करत राहावी.
  • चहा सर्व करतेवेळी कपात किसलेला किवा कापलेला गूळ किवा गूळ पाऊडर घालून चहा गाळनीने गाळून गरमा-गरम सर्व करा.
  • किवा दूध घालण्याआधी चहा उकळताना त्यात गूळ घालून उकळून घ्या. दूध आधी घालू नये. फ्लेम किवा शेगडी बंद करा.
  • १० सेकंदा नंतर दूध घाला. लगेच गाळून गरमा-गरम सर्व्ह करा.

Notes

  • दूध घालून चहा उकळू नये, नाहीतर चहा फुटेल किवा कर्डल होईल.
  • आले वाटून घेतले तर चहा जास्त उकळली नाही तरी चालते.
Keyword ginger, healthy, hot beverage, tea, अद्रक, चहा