आंबा पॅनकेक विथ कंपोट
Sujata Hande-Parab
अतिशय चविष्ट आणि पटकन होणारी हि रेसिपी मी आंबा रस आणि मैदा वापरून केली आहे. त्याला फुलवण्यासाठी मी बेकिंग पावडर आणि सोडा चा वापर केला आहे. फ्लेवर आणि कलर साठी आंबा रस वापरला आहे. आंबा तुकड्या पासून बनवलेल्या कंपोट बरोबर सर्व्ह केला आहे
Prep Time 20 minutes mins
Cook Time 20 minutes mins
Total Time 40 minutes mins
Course Breakfast
Cuisine American, Fusion
- २-३ टेबलस्पून बटर किवा तेल - तळण्यासाठी
- ३-४ टेबलस्पून पीठी साखर - आपल्या चवीनुसार कमी जास्त करा
- १/२ कप आंबा पल्प किंवा घट्ट रस (हापूस आंबा किंवा कोणताही खूप गर असणारा आणि सुवासिक)
- १ - १ १/२ कप दूध सगळे दूध एकदम घालू नये.
- १ कप मैदा
- १/४ कप कॉर्नफ्लोर (सफेद)
- १/२ टीस्पून बेकिंग पावडर
- १/२ टीस्पून खाण्याचा सोडा
सजावटीसाठी आणि सर्व्ह करण्यासाठी
- २-३ टेबलस्पून मध
- १ टेबलस्पून चेरीस बारीक कापलेले
- १-२ टेबलस्पून काजू बारीक कापलेले
कंपोट साठी
- १/२ -१ कप पिकलेला बारीक तुकडे केलेला आंबा (हापूस आंबा किंवा कोणताही खूप गर असणारा आणि सुवासिक)
- ४-५ टेबलस्पून पिठीसाखर
- १/२ - ३/४ कप पाणी
एका वाडग्यात मैदा, कॉर्न फ्लोर घ्या.
त्यात आंब्याचा घट्ट रस आणि दूध घालून हळू हळू ढवळून घ्या.
खाण्याचा सोडा आणि बेकिंग पूड चालून घ्या. मिश्रण परत ढवळून घ्या.
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात एक वाटी चमचा आंबा पीठ मिश्रण घाला आणि पॅन गोलाकार फिरवा.
आच पीठ टाकताना मध्यम जास्त असू द्या. नंतर लगेचच तो मंद मध्यम ठेवा. नाही तर पॅनकेक करपतील.
काही सेकंदांनी थोडे थोडे बुडबुडे पॅनकेक वर येतीलआणि त्याच्या बाजू सुटू लागतील तेव्हा तो परतून घ्या.
दुसरी बाजू १ मिनिटे भाजून घ्या.
काढून प्लेट वर ठेवा.
असाप्रकारे सगळे पॅनकेक काढून प्लेट वर ठेवा.
कंपोट
एका नॉन स्टिक पॅन मध्ये आंब्याचे तुकडे, साखर आणि पाणी घालून ३-४ मिनिटे मिश्रण थोडे घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या
काही आंब्याचे तुकडे चमच्याने मॅश करा.
शेगडी बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
पॅनकेक
एक पॅनकेक प्लेटवर ठेवा
त्यावर केलेले आंबा कंपोट व्यवस्तीत पसरावा.
दुसरा पॅनकेक वर ठेवा
त्यावर देखील आंबा कंपोट व्यवस्तीत पसरावा.
असा प्रकारे तीन किंवा चार वेळा हि कृती रिपीट करा.
सर्व्ह करताना वरून आंबा कंपोट, कापलेले काजू, मध आणि चेरीस घालून सर्व्ह करा.
- मधाऐवजी मॅपल सिरपचा वापर आणि विविध फळाबरोबर हे सर्व्ह करू शकता.
- मिश्रण जास्त घट्ट असल्यास समान तापमानावर असलेले दूध वापरू शकता.
Keyword eggless, Mango, seasonal, पॅनकेक, मॅंगो