
Cuisine: Continental, Course: Salad/Side dish, Diet: Vegetarian
Preparation – 15 Min, Cooking time – 0 Min, Serves – 4
कोलेस्लॉ अनेक व्हेज, नॉनव्हेज डिशबरोबर साइड डिश म्हणून सर्व केले जाते. सँडविच किंवा बर्गर मध्येही ह्याचा वापर केला जातो.
कोलेस्ला (डच शब्द कूलस्ला म्हणजे ‘कोबी सॅलड’ वरून), ज्याला कोल स्लॉ किंवा स्लॉ असेही म्हणतात, हे सॅलड प्रामुख्याने बारीक चिरलेल्या कच्च्या कोबीचा वापर करून आणि ड्रेसिंगसाठी एकतर व्हिनेगर किंवा मेयोनीज घातले जाते.
हे सॅलड बनवण्यासाठी अनेक प्रकार आहेत. काही ठिकाणी मेयोनिज चा वापर न करता किवा कमी प्रकारे करून घट्ट दही वापरुन केले जाते. काही ठिकाणी अॅपल विनिगर(सिरका), तेल, मस्टर्ड सॉस ई. चा वापर ड्रेसिंग मध्ये केला जातो.
बर्गर, सँडविच किवा रोल्स मध्ये घालून ह्या सॅलड चा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
साहित्य
- बारीक चिरलेली कोबी – ३/४ कप
- ज्युलियन किवा उभे बारीक काप केलेले गाजर- १/४ कप
- बारीक चिरलेली ताजी लेट्यूस- १/४ कप
- मेयोनीज– १ १/२ टीस्पून. (कुठलीही बाजारात उपलब्ध असलेली, किवा होमेमेड ही चालेल.)
- घट्ट ताजे दही – १ टेस्पून.
- लिंबाचा रस – १ टीस्पून
- मध – १ टीस्पून
- ताजी काळी मिरी – १/२ टीस्पून
- लाल मिरची फ्लेक्स – १/२ टीस्पून
- चवीनुसार मीठ.
कृती
- एका वाडग्यात बारीक चिरलेली कोबी, लेट्युसची पाने, गाजर ज्युलियन मिक्स करा.
- दुसऱ्या भांड्यात दही, मेयोनीज, लाल मिरची फ्लेक्स, काळी मिरी, मध, मीठ घ्या. एकत्र होईपर्यंत चांगले मिसळा. ड्रेसिंग तयार आहे.


- चिरलेल्या भाज्यांवर घाला आणि नीट मिक्स करून घ्या.


- रेफ्रिजरेट करा वापरायचे असेल ठेवा नॉर्मल तापमानवर आणून त्याचा वापर करा.
- बर्गर, सँडविच किवा रोल्स मध्ये घालून हे सॅलड खूपच छान लागते.

