sujataparabrecipes

कटलेट्स ही डिश स्नॅक्स किवा ब्रेकफास्ट ला ही उत्तम पर्याय आहे. अतिशय हेलथी आणि चवदार अशी ही रेसिपी बनवण्यासाठी मी ब्रोकोलीच्या पाकळ्या ब्लांच करून वापरल्या आहेत.

ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, लोह आणि पोटॅशियम असतात. ह्यामुळे विशेषत: डोळ्यांचे आरोग्य, हृदयाचे आरोग्य आणि रोग प्रतिबंधकारक शक्ति चांगली राहते. असे जरी असले तरी ही भाजी भारतात जास्त प्रमाणात केली जात नाही. तरी ही रेसीपी करून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया करवायला विसरू नका.

Cuisine: Indian, Course: Indian Breakfast/snacks, Diet: Vegetarian

Preparation – 40 Min, Cooking time – 30 Min,  Serves – 3 

  • साहित्य –
  • कटलेट्स मिश्रणासाठी –
    • ब्रोकोली फ्लोरेट्स किंवा पाकळ्या – १ कप (दाबून भरलेले)
    • उकडलेले बटाटे – १ मध्यम (किसलेले)
    • जिरे – १ टीस्पून
    • कांदा – १ लहान किंवा मध्यम बारीक चिरून
    • लिंबाचा रस – १/२ टेबलस्पून किंवा अर्धा लिंबू
    • हळद पावडर ब्लांचिंग साठी – १/२ टीस्पून + १/४ टीस्पून
    • गरम मसाला – १/२ टिस्पून
    • गरम पाणी – ब्लांचिंग साठी –  २ कप
    • ब्लांचिंग साठी मीठ – १/२ टिस्पून + कटलेट्स साठी मीठ चवीनुसार
    • हिरवी चटणी किंवा मसाला –
    • हिरव्या मिरच्या – ३-४
    • लसूण पाकळ्या – ५-६
    • किसलेले आले – १ १/२ टेस्पून
    • तेल – २-३ टेबलस्पून तळण्यासाठी
  • स्लरीसाठी किंवा घोळ बनवण्यासाठी –
    • एक लहान चिमूटभर मिठ
    • तांदूळ पिठ – ३-४ टेबलस्पून
    • जाड स्लरीसाठी आवश्यक असलेले पाणी.
  • कटलेट्स आवरणासाठी – थोडे भाजलेले रोलड ओट्स – १/२ – १ कप
  • इतर साहित्य – सर्व्हिंग साठी – टोमॅटो केचप किंवा कोणतेही डीप

कृती –

१. कटलेटसाठी – लसूण, हिरव्या मिरच्या, आले लसूण बारीक पेस्ट करून घ्या.

२. गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून उकळी काढून घ्या. त्यात   ब्रोकोली फ्लोरेट्स किंवा पाकळ्या टाकून २-३ मिनिट्स ठेवा.

३. थोड्या वेळाने पाणी पूर्णपणे काढून टाकावे. थंड पाणी टाकून गाळून घ्या.  मिक्सर मध्ये टाकून जाडसर भरड कडून घ्या. पेस्ट करू नका.

४. एका कडाई किंवा नॉनस्टिक पॅन मध्ये तेल गरम करा. जिरे घालावे. त्याला तडतडू द्या.

५. बारीक चिरलेला कांदा घाला. पारदर्शक होईपर्यंत शिजवा.

६. तयार हिरवी पेस्ट तयार करा. कच्चा सुगंध दूर होईपर्यंत शिजवा.

७. हळद पावडर, गरम मसाला, मीठ घाला. काही सेकंदांमधे ढवळा.

८ त्यात जाडसर वाटलेले किंवा खिमा केलेले ब्रोकोली मिश्रण घालून चांगले ढवळून आणि एकजीव करून घ्यावे.

९. किसलेले बटाटे घालावे. चांगले एकजीव करावे.

१०. लिंबाचा रस घाला. ढवळून घ्या.

११. चमच्याने किंवा मॅशरचा वापर करून मिश्रण चांगले मॅश करा.

१२. घोळ बनवण्यासाठी – एका वाडग्यात, तांदुळाचे पीठ, मीठ घाला. पाणी हळू घाला.  एक जाडसर घोळ तयार होईपर्यंत मिक्स करावे.

१३. एका प्लेटमध्ये थोडे भाजलेले रोल्लेड ओट्स घ्या.

१४. ८-९ समान भागांमध्ये विभागून घ्या. एक गुळगुळीत चेंडू सारखा आकार करून घ्या.

१५. थोडेसे हाताच्या तळव्यात दाबून कटलेट किंवा छोट्या वाडी सारखा आकार द्या.

१६. तयार पिठाच्या घोळात बुडवून घ्या.

१७. भाजलेले रोल्लेड ओट्स मध्ये व्यवस्तिथ सगळ्या बाजूनी कोट करून घ्या.

१८. नॉनस्टीक पॅन मध्ये तेल गरम करून त्यावर कटलेट्स ठेवा. कमी मध्यम आचेवर १-२ मिनिट्स साठी तळून घ्या.

१९. दुस-या बाजूला परतून 1-2 मिनिटे तळून काढावे. थोडे तेल शिंपडा.

२०. पुन्हा परता. दोन्ही बाजूंनी गोल्डन ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

२१. तळून झाल्यावर प्लेटमध्ये काढून घ्या.

२२. टोमॅटो केच अप किंवा कोणत्याही डीप बरोबर गरम सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!