sujataparabrecipes

ओव्याची पानांची भजी किवा पकोडे

Cuisine: Indian, Course: Snacks/Side dish, Diet: Vegetarian

Preparation – 15 Min, Cooking time – 10 Min, Serves – 2 

महाराष्ट्रात आपण ह्या पानांना ओव्याची पाने म्हणतो. ह्या पानांना एक विशिष्ट सुगंध असतो. ओव्याची पाने त्याच्या सुगंध आणि आरोग्यादायी फायद्यांमुळे खाद्यपदार्थांमध्ये वापरली जातात.

ओवा किवा ज्याला कैरम सीड्स किवा आजवईन म्हणून ओळखले जाते. ओव्याच्या बिया किवा ओवा अनेक पाककृतींमध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून वापरला जातो. तो फक्त चवीलाच चांगला नाही तर त्याचे शररीराला फायदे ही खूप असतात.

ओव्याच्या बियांप्रमाणेच ओव्याची हिरवीगार पाने देखिल औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहेत आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. घरातील बागेतही ओव्याच्या झाडाची लागवड देखील करता येते.

खालील रेसिपी तयार करायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम आहे. हे अनेक घरांमध्ये साइड डिश म्हणून तयार केली जाते. ओव्याची पाने वर्षभर उपलब्ध असतात. त्यात बरीच औषधी मूल्ये आहेत ज्यामुळे पाककृती तयार करताना ही पाने एक हेल्दी पर्याय ही बनतात.

  • साहित्य :-
    • ओव्याची पाने – 14-15
    • बेसन – १ कप
    • तांदळाचे पीठ – 2 टेबलस्पून
    • लाल तिखट – ½ टीस्पून
    • गरम मसाला – 1 टीस्पून
    • हिंग – १/२ टीस्पून
    • तळण्यासाठी तेल
    • चवीनुसार मीठ.
    • घोळ किवा स्लरी बनवण्यासाठी पाणी
  • कृती :-
  • कॅरमची पाने धूऊन आणि व्यवस्तीथ फडक्याने पुसून घ्या.
  • एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हिंग, मीठ, लाल तिखट आणि गरम मसाला घ्या. चांगले मिसळा.
  • थोडे थोडे पाणी घालून थोडी घट्टसर घोळ किवा स्लरी बनवून घ्या.
  • कढईत तेल गरम करा.
  • कॅरमची पाने बनवलेल्या पिठाच्या घोळात बुडवा, सर्व बाजूंनी व्यवस्थित कोट करा आणि मंद आचेवर सोनेरी आणि करकुरीत होईपर्यंत तळा.
  • गरमागरम डाळ भातासोबत किंवा कोणत्याही डिप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!