Cuisine: Indian, Course: Condiment / Side dish , Diet: Vegetarian
Preparation – 15 Min, Cooking time – 15-20 Min, Serves – 4
कच्चा आंबा मुरांबा ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन साइड डिश आहे. ज्याची चव थोडी आंबट, मसालेदार, गोड, खारट अशी अनोखी चव आहे. चपाती, रोटी बरोबर छान लागते.
मुर(मुरलेला) आणि आंबा म्हणजेच साखरेत मुरलेला आंबा. महाराष्ट्रात आंब्यांची फार रेलचेल असते. त्यामुळे आंबे फुकट न जाता कसे टिकवता येतील याकडे जास्त कल असतो. मग आंब्यांच्या वेगवेगळ्या प्रकारचे टिकणारे पदार्था जसे की मुरांबा, सोलं(सुकलेले आंब्याचे तुकडे. कोकमा ऐवजी ही सोले वापरली जातात.), विविध प्रकारची लोणची, चटण्या, मिठातील कच्चे आंबे असे प्रकार बनवले जातात. त्यातीलच ही एक डिश.

- साहित्य
- कच्चा आंबा किसलेला – ½ कप (शक्यतो तोतापुरी किवा कुठलाही मोठा आणि कडक आणि ताजा आंबा चालेल.)
- साखर – 3-4 चमचे
- हिरवी वेलची पावडर – ½ टीस्पून
- केसर स्ट्रँड्स – ८-९ (पर्यायी)
- एक लहान चिमूटभर मीठ
- टेम्परिंगसाठी – (फोडणीसाठी)
- जिरे पावडर – 1/4 टीस्पून
- बारीक वाटलेली काळी मिरी – ½ टीस्पून
- लाल तिखट – ½ टीस्पून
- तेल – 1 ½ टीस्पून
कृती
1. नॉनस्टिक पॅनमध्ये किसलेला कच्चा आंबा घ्या.

2. साखर, केसर स्ट्रँड्स घाला आणि साखर विरघळेपर्यंत आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत 4-5 मिनिटे शिजवा.


3. वेलची पावडर आणि मीठ घालून मिक्स करा.

4. सॉसपॅन किंवा तडका पॅनमध्ये तेल गरम करा.

5. त्यात काळी मिरी, जिरेपूड आणि लाल तिखट घाला.

6. ही फोडणी तयार आंब्याच्या मुरब्ब्यावर घाला.

7. चांगले ढवळा. मुरब्बा तयार आहे.

टीप –
मुरब्बासाठी, थोडे गोड, आंबट जातीचे कच्चे आंबे वापरा.