sujataparabrecipes

खरबुज पुडिंग हे काजू बदाम पेस्ट, खरबूज, सब्जाआणि दूध ह्यापासून बनलेले आहे. काजू आणि बदाम ह्या डिश ला एक वेगळी चव आणि रिचनेस देतात. हे थंड्गारच सर्व्ह करावे. 

  • Preparation Time
    20 minutes
  • Chilling
    2 hours
  • Serves
    4 adults
  • Difficulty
    Easy

साहित्य

  • खरबूज – १ कप बारीक काप केलेले आणि थंड (व्यवस्तीत पिकलेला)
  • थंड दूध –१ – १ १/२ कप
  • साखर – २ टेबलस्पून
  • काजू – ८-९  
  • बदाम – ८-९  सोलून बारीक कापलेले (ब्लांचड)
  • सजावटीसाठी – थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे , चेरीस, काजू – बदाम बारीक कापलेले

कृती

  1. मिक्सर मध्ये काजू आणि बदाम वाटून घ्या.
  2. त्यात थंडगार खरबुजाचे काप, साखर, थंडगार दूध, एकत्र करून प्युरी करून घ्या.
  3. वाडग्यात काढून घ्या.
  4. सब्जा २ टेबलस्पून पाण्यात घालून ५ मिनिटांसाठी फुलण्यासाठी भिजवून ठेवा. थोड्या वेळाने त्या पारदर्शक आणि आकाराने दुप्पट होतील.
  5. फुगलेल्या सब्जा किंवा चिआ सीड्स मिक्स करून घ्या.
  6. थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे, चेरीस, काजू – बदाम बारीक कापलेले टाकून थंडगार सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!