
- Preparation Time
10 minutes - Cooking Time
15 minutes - Serves
4 adults - Difficulty
Easy
साहित्य
- पिवळा किंवा लाल भोपळा – ३/४ कप (सोलून १/४ इंच जाड फ्राईज किंवा उभे काप घ्या)
- बेसन – १/२ कप
- लाल तिखट – १/२ टीस्पून
- गरम मसाला – १/२ टीस्पून
- हिंग – १/४ टीस्पून
- जिरे – १/२ टीस्पून
- कोथिंबीरीची पाने – १-२ टेबलस्पून बारीक चिरून
- तळण्यासाठी तेल
- मीठ – १/४ टीस्पून किंवा चवीनुसार
- पाणी – १/४ कप किंवा आवश्यकतेनुसार
कृती
- पिवळ्या किवा लाल भोपळ्याचे दोन भाग करा. लगदा आणि बिया काढून टाका. सोलून घ्या.
- भोपळ्याच्या प्रत्येक भागाचा शेवटचा भाग कापून टाका. जर भोपळा आधीच कापलेला असेल तर फक्त त्याचा शेवटचा भाग कापून त्याला एक आयतकार आकारामध्ये कापून घ्या. राहिलेल्या तुकड्यांचा वापर भाजी किवा करी मध्ये करता येतो.
- एक भागाचे दोन तुकडे करा. १/४ इंच जाडसर उभे काप करून घ्या.
- ही कापे किवा भोपळ्याचे उभे काप एका ताटात काढून त्यावर मीठ घालून घ्या आणि त्यांना मीठ चांगले चोळून घ्या.
- एका भांड्यात वर दिलेले सगळे साहित्य फक्त तेल आणि पाणी वगळता मिसळून घ्या.

- एका वेळी हळूहळू पाणी घालून जाडसर पीठ किवा स्लरी तयार करून घ्या.

- कढईत तेल गरम करा.
- पिठात भोपळ्याच्या केलेले तुकडे बुडवून सगळ्या बाजूंनी बेसनाच्या स्लरी मध्ये कोट करून घ्या आणि मंद आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

- गरमागरम डाळ भातासोबत किंवा कोणत्याही डिप किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

टीप
भोपळ्याच्या कापाना मीठ लावून घेतल्याने त्यात मीठ व्यवसतिथ मुरते आणि चवही चांगली लागते.
भोपळा शक्यतो ताजा आणि कडक असावा. पिकलेला नसावा.