sujataparabrecipes

आमरस हि एक खूपच पॉप्युलर आणि सगळ्यांच्या आवडीची डिश असून महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण विभागात खूप प्रमाणात बनवली जाते. महाराष्ट्र मध्ये कोकणात हि डिश आंब्याच्या मोसमात रोजच जेवणामध्ये आढळते. हापूस आंबा वापरून केलेला आमरस खूपच चविष्ट लागतो. आमरस, आमरस पुरी, कुल्फी, आइसक्रीम, आंबा पुरी असे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.

साहित्य

  • पिकलेले आंबे –  २  बाटी काढून तुकडे केलेले (शक्यतो हापूस किंवा कोणताही गोडं, जास्त पल्प असलेला आंबा )
  • साखर –  १-२ टेबलस्पून (आंबा पल्पच्या गोडीवर अवलंबून आहे)
  • पाणी – १-२ टेबलस्पून

कृती

  • पिकलेले आंबे धुवून, साल काढून बारीक कापून घ्यावे. बाट टाकून द्या.
  • ते ब्लेंडरमध्ये घाला. साखर घालावी.
  • प्युरी किंवा रस करून घ्या.
  • प्युरी किवा लगदा खूप घट्ट असेल तरच १-२ टेबलस्पून पाणी घाला. पुन्हा एकदा मिक्सरला वाटून घ्या.
  • एका वाडग्यात किवा हवाबंद डब्यात किवा बरणीत ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • थंड सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!