
Cuisine: Indian, Course: Sweet/Side dish, Diet: Vegetarian
Preparation – 12 Hrs, Making time -15 minutes , Serves – 6
महाराष्ट्रात एखादा सण म्हटला की पुरी आणि पुरी आली की बरोबर श्रीखंड ही आलेच पाहिजे. गोल गोल क्रिसपी पुरी आणि मऊ आणि क्रिमी थोडेसे आंबट आणि गोड श्रीखंड खूपच अप्रतिम लागते.
पहिल्या काळी श्रीखंड हे घराघरात केले जायचे. हल्ली मार्केट मध्ये इझिली मिळत असल्या कारणाने ही प्रथा कमी झाली आहे. पण शेवटी घरचे ते घरचेच त्याला मार्केट ची सर कशी येईल.
श्रीखंड हा शब्द ‘शिकारिणी’ या संस्कृत शब्दापासून आला आहे ज्याचा अर्थ दही आहे. श्रीखंडडा मध्ये दही, साखर, केशर, सुका मेवा यांसारखे असतात. श्रीखंडा मध्ये आमरस घालून आम्रखंड बनविला जातो. महाराष्ट्रात श्रीखंडाचा वापर करून पीयूष हा पदार्था ही बनविला जातो.
श्रीखंड बनविण्यासाठी गोडसर दही एका मलमल च्या कपड्यात बांधून ते रात्रभर टांगले जाते किवा ते फडक्यात घट्ट बांधून ते चाळणीवर ठेवून त्यावर वजन ठेवले जाते. जेणे करून त्यातील पाणी निघून जाईल आणि आपल्याला चक्का (घट्ट दही) मिळेल.
साहित्य –
- श्रीखंडासाठी –
- गोड घट्ट दही – 5-6 कप
- पिठी साखर / बारीक साखर – १ ¾ कप
- केशर स्ट्रँड्स – 1 1/2 टिस्पून
- कोमट दूध – 2 टेबलस्पून
- वेलची पावडर – 1 टीस्पून
- जायफळ पावडर – ½ टीस्पून
- जाडसर वाटून घेतलेली किंवा बारीक कापलेला सुका मेवा किवा ड्राय फ्रूइट्स (काजू, बदाम, पिस्ता) – 2-3 टेबलस्पून
कृती –
- मलमलच्या कापडाने किंवा चीज कापडाने स्ट्रेनर किवा चाळणी वापरून दही गाळून घ्या.
- कापडाच्या कडा एकत्र आणा आणि व्यवस्तीथ गाठ मारून घ्या.
- ही पोटली एखाद्या ठिकाणी रात्रभर टांगून ठेवा. जेणे करून दह्यातील सर्व पाणी निघून आपल्याला चक्का मिळेल. पडणारे पाणी गोळा करण्यासाठी वाडग वापरा.
- दुसऱ्या दिवशी एका मोठ्या खोल भांड्यात हे मिश्रण किवा चक्का काढून घ्या.
- चक्कात साखर, जायफळ पावडर आणि वेलची पावडर घाला. हँड बीटर किवा गोल मोठी पळी(लार्ज ladle) वापरून चांगले मिसळा किंवा फेटा.
- दुधात विरघळवून घेतलेले केशर, बारीक कापलेला सुका मेवा घाला. चांगले मिसळून घ्या.
- हवाबंद डब्यात काढून घ्या आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
- थंड करून सर्व करा
टीप –
- सुका मेवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त करता येतो.
- चक्का मिक्सर ला ही लावून एक प्ल्स देऊन मिक्स करू शकतो पण त्यामध्ये जर जास्त प्रमाणात मिक्स केले गेले तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.