केक हा असा पदार्थ आहे की त्याचे नाव घेताच वेगवेगळ्या प्रकारचे, चवीचे, फळांचे केक समोर येतात. त्यातल्यात्यात चॉक्लेट, फ्रूट, क्रीम केक हे सगळ्यांनच्याच आवडीचे असतात. अनेक प्रकारचे केक जसे की स्पॅन्ज केक, पिठविरहित केक, नो शुगर केक असे बरेचसे प्रकार पाहायला मिळतात.
केक ज्याला आवडत नाही असा व्यक्ति शोधुनही सापडणार नाही. आजकाल तर कुठल्याही कार्यक्रमाला केक कापणे ही एक प्रथा झाली आहे. असाच काही केक च्या रेकिपीज मी दाखवणार आहेत.
काही जणांना केक म्हटले की खूप कठीण असे काही वाटते आणि परत ओवेन किवा मायक्रोवेव असेल तरच केक करता येतो असा गैरसमज असतो. पण थोडीशी टेकनिक आणि मापे लक्षात ठेवली तर केक हा सर्वात सोपा आणि पटकन होणारा असा पदार्थ आहे.
मी खालील रेसीपीमध्ये फळाचा वापर करून केक केलेला आहे. सीजनल फळे वापरुन विविध प्रकारचे केक कपकेक बनवता येतात.

मोसंबी केक(अंडीविरहित) विथ मोसंबी ग्लेझ
Ingredients
- १ १/४ कप मैदा
- १ टीस्पून बेकिंग पावडर
- १/२ टीस्पून बेकिंग सोडा
- एक छोटी चिमूटभर मीठ
- ३/४ कप ताजा मोसंबीचा रस
- ३/४ चमचे + १ टीस्पून स्वीट लाइम जेस्ट किसलेलीमोसंबीची साल
- १/२ कप साखर जाडी
- १/२ कप घट्ट दही ताजे
- १/२ कप तेल ऑलिव तेल किवा सूर्यफूलतेल कुठलेही वास न येणारे तेल
- १/२ टीस्पून व्हॅनिला एसेन्स
मोसंबी ग्लेझ – (पर्यायी)
- ३-४ टेबलस्पून पिठी साखर
- २-३ टेबलस्पून मोसंबीचा रस
- एक लहान थेंब व्हॅनिला एसेन्स
Instructions
- ओव्हन १८० डिग्री सेल्सियस वर गरम करा.
- सर्व ओले साहित्य जसे की तेल, गोड लिंबाचा रस, जेस्ट, दही, व्हॅनिला इसेन्स एकाभांड्यात मिक्स करा.
- साखर घाला. साखरविरघळेपर्यंत आणि मिश्रण थोडे फुलेपर्यन्त चांगले फेटूनघ्या.
- मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडाएकत्र दोन-तीनदा चाळून घ्या.
- मीठ घालावे.चांगले मिसळा. बाजूला ठेवा.
- सर्व सुखे घटक हळूहळू ओल्या मिश्रणात मिसळा. हळूवारपणे मिक्सकरा. जास्त किवा ओवर मिक्स करू नका.
- बटर पेपर (बेकिंगचा) केक टिनच्या मापाचा कापून घ्या आणि पॅन किवा टिनच्या तळाला लावून घ्या.
- किवा तेल सगळ्या टिनला लावून वरुन थोडे मैदयाचे पीठ टाकून व्यवसतिथ रित्या टॅप करा. जेणेकरुन पिठ समान रीतीने टिन च्या सगळ्या बाजूने लागेल आणि केक टिनला चिकटणार नाही.
- केकचे तयार मिश्रण टिन मध्ये घाला. टिनला हलकेच टॅप करा आणि एका टुथपीक पिठात फिरवून घ्या परत टॅप करा, जेणेकरून पिठ समान रीतीने पसरेल. तसेच जर मिश्रणात हवेचे बुडबुडे असतील तर ते ही निघून जातील आणि केक बेक झाल्यावर वर फुगा ही येणार नाही.
- मोसंबीची किसलेली साल वरुन टिन मध्ये टाकलेल्या मिश्रणावर पसरवा,
- प्रीहिटेड ओवन मध्ये ३०-३५ मिनिटे बेक करावे. टूथ पिक घाला, ते स्वच्छ बाहेर आले पाहिजे. पॅन काउंटरवर ५-१० मिनिटे राहू द्या.
- केक फ्लिप करा आणि वायर रॅकवर थंड होऊ द्या. नंतर तो फ्रीज मध्ये ठेवून द्या. थोडा थंड झाला की त्याला क्लिंग रॅप मध्ये गुंडाळून फ्रीज मध्ये ठेवून द्या.
मोसंबी ग्लेझ – (पर्यायी)
- एका छोट्या भांड्यात पिठी साखर घ्या.
- ग्लेझला मस्त चमक येईपर्यंत आणि इच्छित कंनसीस्टंसी येईपर्यंत हळूहळू मोसंबीचा रस घाला. (ग्लेजखूप जाड किंवा पातळ असल्यास अधिक रस किंवा साखर घाला).
- व्हॅनिला एसेन्सचा एक छोटा थेंब घाला. चांगले मिसळा.
- ही केलेली ग्लेझ केक वर पसरवून घ्याआणि १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा.
- केकचे तुकडे करूनसर्व्ह करा.
Notes
- केक तयार करताना सर्व घटक सामान्य तापमानवर असावेत.
- मैदा दोन-तीनदा चाळल्याने अशुद्धता निघून जाते आणि केक स्पॉन्जी बनतो.
- ग्लेज खूप जाड किंवा पातळ असल्यास अधिक रस किंवा साखर घाला.