
Cuisine: Indian, Course: Side dish/kids friendly, Diet: Vegetarian
Preparation – 10 Min, Cooking time -5 Min, Serves – 2-3
मसाला पापड हा भारतातील एक लोकप्रिय स्नॅक आहे जो भाजलेले किंवा तळलेले पापड वापरून तयार केला जातो. हा कोणत्याही मसालेदार डिपसोबत चवीला छान लागते.
महाराष्ट्रात अजूनही पापडाशिवाय जेवण पूर्ण होत नाही. पापड, लोणचे, कोशिंबीर, चटणी असे बरेचसे पदार्थ जेवणाच्या थाली मध्ये आवर्जून बघायला आणि खायला मिळतात.
आमच्या लहानपणी पापड हा घरी बनवला जात असे मग तो विविध प्रकारचा असे. जसे की उडीद पापड, पोहयाचे पापड, तांदळाचे पापड आणि असेच बरेच प्रकार घरी बनवले जायचे. आणि त्यांना चवही फार असे. हल्ली शहरात घरे लहान किवा सुकवायला जागा नसल्याने पापड हा प्रकार फारच कमी ठिकाणी बनवलेला पहायला मिळतो.
साहित्य
- लहान उडीद किवा मुगाचे पापड – ४-५
- बारीक चिरलेला टोमॅटो – १/४ कप (बिया आणि पल्प काढून घेतलेला)
- बारीक चिरलेला कांदा – १/४ कप
- चाट मसाला – १ टीस्पून
- लाल मिरची पावडर – १ टीस्पून
- चिरलेली कोथिंबीर पाने – १/२ टीस्पून
- लिंबाचा रस – २ टेबलस्पून किवा २-३ वेजेस
- शेव – २-३ टेबलस्पून (कोणत्याही फ्लेवरची – नायलॉन किवा बारीक शेव)
- शेंगदाणा किवा सूर्यफूल तेल – १-२ टेबलस्पून (पापड तळण्यासाठी)
कृती
- नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. पापड ठेवा. फ्लॅट स्पॅटुला किवा पलिता वापरून दोन्ही बाजूंनी तळून घ्या किंवा एक मिनिट मायक्रोवेव्ह करा.




- एका प्लेटमध्ये काढा. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व पापडावर समान रीतीने पसरवा.


- चाट मसाला, लाल तिखट, शेव पसरवून घ्या.

- पापडाच्या वर लिंबू पिळून घ्या. जास्त पिळू नये नाहीतर पापड नरम पडेल.
- लगेच सर्व्ह करा नाहीतर नरम पडेल आणि मसाला पापड हा कुरकुरीतच अप्रतिम लागतो.

टीप
- लिंबू जास्त पिळू नये आणि तो लगेचच सर्व्ह करा नाहीतर पापड नरम पडेल
- पापड आपल्या चॉइस प्रमाणे मोठा लहान किवा उडीद, मुगाचा घेतला तरी चालतो.