sujataparabrecipes

हमोस पूर्ण अरेबिक नाव: हमस बी ताहिनी अरबी भाषेमध्ये लेवेन्टाइन डीप किंवा शिजवलेले चणे किंवा इतर बीन्स वापरून, ताहिनी सौस, ऑलिव तेल, लिंबाचा रस, मीठ आणि लसूण यांचे मिश्रण करून बनवलेले स्प्रेड. हे मध्य पूर्व आणि जगभरातील मध्यपूर्वीच्या पाककृतीमध्ये अतिशय लोकप्रिय आहे.

सलाद, चिप्स, नाचोस , क्रॅकर्स किंवा बर्गर, सँडविचसह मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते.

या कृतीत मी शिजवलेले बीटरूट व काही मसाल्यांचा वापर केला. हे व्हेज सलाड किंवा सँडविच बरोबर खूप स्वादिष्ट लागते.

  • Preparation Time
    10 minutes
  • Cooking Time
    15 minutes
  • Serves
    4 adults
  • Difficulty
    Easy

साहित्य

  • उकडलेले काबुली चणे  – १/२ कप
  • शिजवलेले बीटरूट – १/२ कप
  • ताहिनी सॉस – १ टेबलस्पून
  • लिंबाचा रस – २ टीस्पून
  • लसूण पाकळ्या – २-३
  • भाजलेले जिरे पावडर – १ टीस्पून
  • ताज्या कुटलेली काळी मिरी  – १ टीस्पून
  • ऑलिव्ह ऑइल किंवा कोणतेही तेल – १/२ टेबलस्पून
  • चवीनुसार मीठ

कृती

  1. ब्लेंडर मध्ये सर्व साहित्य घेऊन व्यवस्तिथ वाटून घ्या.
  2. क्रॅकर्स, सलाड स्टिक किंवा नाचोस बरोबर सर्व्ह करा.
  3. हवाबंद डब्यात स्टोअर करा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून द्या. दोन दिवसांत वापरा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!