+1

इडियप्पम (मल्याळम) याला तुलूमध्ये सेमिगे, कन्नडमध्ये शाविगे, इंग्रजीमध्ये स्ट्रिंग हॉपर्स, गोव्यात शेव्यो आणि महाराष्ट्रात सेवया म्हणूनही ओळखले जाते. ह्या वाफावलेल्या असतात आणि कोणत्याही व्हेज, नॉनव्हेज करी किंवा नारळाच्या दुधासोबत सर्व्ह केले जातात. ह्या प्रामुख्याने तांदळाच्या पिठाने बनवल्या जातात आणि मसालेदार व्हेज करी किंवा गोड नारळाच्या दुधासह सर्व्ह केले जाते.
या रेसिपीमध्ये मी तांदळाच्या पिठाच्या ऐवजी बाजरीचे(पर्ल मिलेट) पीठ वापरले आहे. अतिशय पौष्टिक, ग्लुटेन फ्री अशी ही रेसीपी नारळाच्या दुधाबरोबर अतिशय चवदार लागते.
- Preparation Time
20 minutes - Cooking Time
15 minutes - Serves
4 adults - Difficulty
Easy
साहित्य
- बाजरी पीठ – १ १/२ कप
- तूप – २ चमचे
- चवीनुसार मीठ
- पाणी – 1 कप
- गोड नारळाच्या दुधासाठी
- नारळाचे दूध – दीड कप (कोमट)
- किसलेला गूळ – १/४ -१/२ कप (तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करा.)
- जायफळ पावडर – १/४ टीस्पून
- वेलची पावडर – १/२ टीस्पून
कृती
गोड नारळाच्या दुधासाठी
- एका खोलगट भांड्यात नारळाचे दूध घ्या. ते थोडे कोमट असावे.
- किसलेला गूळ घाला. ते विरघळेपर्यंत चांगले मिसळा.
- जायफळ आणि वेलची पावडर घाला. चांगले मिसळा.
- एका बारीक जाळीच्या गाळणीतून नारळाचे दूध गाळून घ्या. गोड नारळाचे दूध किंवा ग्रेव्ही तयार आहे
इडियप्पम साठी
- पॅनमध्ये पाणी उकळवा. मीठ आणि तूप घाला. बाजरीचे पीठ हळूहळू मिसळा.
- कणिक एकत्र येईपर्यंत मिक्स करा. हे करताना आच मंद ठेवा. जर पीठ खूप चिकट किवा पाणी जास्त वाटत असेल तर थोडे बाजरीचे पीठ घाला. चांगले मिसळा.
- पीठ व्यवसतिथ एकत्र झाल्यावर गॅस फ्लेम बंद करा. १५ मिनिटे पॅन झाकून ठेवा.
- हाताच्या तळव्यांना थोडे साधे पाणी लावा आणि हळू हळू पीठ मळायला घ्या.
- मळलेले पीठ कापडाने झाकून ठेवा. पीठाचे छोटे भाग करा आणि लंबाकार (लॉगमध्ये) आकार द्या आणि शेव प्रेस किंवा मोल्ड किंवा इडियाप्पम साच्यात घाला
- प्रत्येक भाग इडियप्पम मोल्ड किंवा शेवया (सर्वात बारीक होल असलेला साचा वापरुन शेवया किवा इडियप्पम एका प्लेट वर हळू हळू प्रेस करून गोलाकार आकारात काढून घ्या.
- प्रेस करून काढलेले इडियाप्पम्स ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. फ्लेम बंद करा इडली कुकरमध्ये आणखी ३-४ मिनिटे तसेच ठेवा.
- प्लेट्स काढा आणि काही सेकंद बाजूला ठेवा.
- प्रत्येक इडिअप्पम प्लेटवर काढा आणि नारळाच्या दुधासोबत किंवा कोणत्याही मसालेदार करीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
+1