
Cuisine: Indian, Course: Chutney, Diet: Vegetarian
Preparation – 15Min, Cooking time -15 minutes , Serves – 3
हिरव्या मिरचीचा ठेचा हि एक महाराष्ट्रीयन पारंपरिक रेसिपी आहे. मी त्या रेसिपीत थोडा बदल करून उपसासाठी चालणारा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला आहे. मी कमी तिखट असलेल्या मिरच्या वापरल्या आहेत. आपल्या सोयीनुसार आणि आवडीनुसार कमी जास्त तिखट वापरू शकता.
साहित्य
- ताज्या हिरव्या मिरच्या – ५-६ मध्यम तिखट
- जिरे – १ टीस्पून
- ताजे किसलेले किंवा पातळ काप केलेले खोबरे – २-३ टेबलस्पून
- ताजे किसलेले आले – १ टीस्पून
- भाजलेले शेंगदाणे – २ १/२ tbsp
- लिंबाचा रस – १/२ टीस्पून
- मीठ सैंधव किंवा साधे – चवीनुसार
कृती
- एका कढईत किंवा टोपात तेल मिरच्या चांगल्या भाजून घ्याव्यात. त्यावर थोडे थोडे काळे टिपके आले कि समजावे त्या भाजल्या आहेत. जास्त काळ्या करू नयेत.
- त्यात खोबरे टाकून १/२ मिनिट भाजून घ्यावे
- त्यात जिरे, आले टाकावे परतून घ्यावे.
- मिक्सरला थोडे जाडसर वाटले कि त्यात भाजलेले शेंगदाणे, जिरे, मीठ टाकावे आणि एकदा फिरवून घ्यावे. आपल्याला एकदम बारीक पेस्ट नको आहे. भरड हवी आहे.
- त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करावे.
- कोणत्याही फराळी पराठा, पुरी, थालीपीठ बरोबर सर्व्ह करावे.
टीप
लिंबाचा रस हिरवा रंग तसाच ठेवण्यास मदत करतो आणि चवही चांगली लागते.