sujataparabrecipes

Cuisine: Indian, Course: Snacks / Diwali Recipes/Kids Friendly, Diet: Vegetarian

Preparation –  35 Min , Cooking time -30 minutes , Serves – 10

साहित्य

  • मैदा – ३ कप किंवा ५०० ग्रॅम
  • बारीक रवा – १/४ कप
  • ठेचलेले जिरे – १ टीस्पून
  • ताजी काळी मिरी – १/२ टीस्पून
  • मीठ – १ टीस्पून किंवा चवीनुसार
  • तेल – ४ कप
  • कोमट तूप – ३/४ वाटी (पीठ मळणे)
  • पाणी –पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार अर्धा कप साधे पाणी

कृती

  • एका मोठ्या भांड्यात किवा परातीत तेल, तूप, पाणी सोडून वरील सर्व साहित्य घ्या. चांगले मिसळा.
  • पिठाच्या मध्यभागी एक विहीर बनवा. गरम तूप घाला. चमच्या मदतीने मिक्स करा.
  • पीठ क्रम्ब्ली  होईपर्यंत चांगले मिसळून घ्या.
  • हळूहळू पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या. झाकण ठेवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
  • त्या पिठाचे ५-६ समान गोळे तयार करून घ्या.
  • पोलपाटला तेल लावून घ्या. तयार पिठाचा गोळा त्यावर ठेवा आणि सर्व बाजूंनी समान रीतीने रोल करा. ते थोडे जाड असावे. काटा चमचा वापरून त्या पोळीला सगळ्या बाजूंनी टोचून घ्या म्हणजे पुरी फुगणार नाही.
  • गोल कटर किवा लहान ग्लासचा वापर करून त्यांना 3-४ इंच वर्तुळात कापून घ्या.
  • असा प्रकारे उरलेल्या पिठाच्या देखील पुर्‍या तयार करा आणि तळण्यासाठी तयार ठेवा.
  • कढईत तेल गरम करा. तेल गरम असावे. पुर्‍या टाकल्यावर गॅसची फ्लेम मध्यम कमी असावी.
  • हलक्या तपकिरी आणि कुरकुरीत होईपर्यंत मंद मध्यम आचेवर बॅचमध्ये सगळ्या पुर्‍या  तळून घ्या. जास्त लाल होईपर्यंत तळू नये नाहीतर त्या थंड झाल्यावर जास्तच ब्राऊन होतील.
  • तळताना पुर्‍या कढईत राहतील एतक्याच तळण्यास टाकाव्या. त्यांना उच्च आचेवर तळू नये.
  • पुर्‍या बाहेर काढताना झार्‍याचा वापर करा जेणे करून सगळे तेल निथलेळ. किचन टॉवेलवर काढा.
  • थंड करून हवाबंद डब्यात साठवा.
  • चहा किंवा कॉफीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!