sujataparabrecipes

ही एक महाराष्ट्रियन डिश आहे. उपवासामध्ये वरीच्या भाताचा वापर फराळ म्हणून वेगवेगळ्या रेसिपी बनवून केला जातो. जसे की, वरीचा प्लेन भात, वारी दही भात, वरीचा शिरा, खीर असे विविध रुचकर पदार्थ बनवता येतात. वरीचे लाडू किवा चिक्की हे प्रकार तर आपण ऐकलेच असतील.

ह्याला समा के चावल किवा सामक भगर अश्या विविध नावांनी ओळखले जाते.

वरीचा भात हा नॉर्मल किवा साधारण आपण खातो त्या भाता पेक्षा फारच वेगळा असतो. हा फार लवकर शिजतो आणि ह्याला पाणीही कमी लागते. चवीला बर्‍याचसा भाता सारखाच लागतो.

नवरात्रि, श्रावण किवा ईतर कोणत्याही उपवासला हा भात केला आणि खाल्ला तरी चालतो. काही ठिकाणी उपवासला तेल किवा मीठ वापरत नाहीत असा वेळेला तूप किवा सैंधव मीठाचा वापर केला तरी चालतो.

  • Preparation Time
    10 minutes
  • Cooking Time
    20 minutes
  • Serves
    4 adults
  • Difficulty
    Easy

साहित्य

वरी जिरा भात

  • भगर किंवा वरीचा तांदूळ – ३/४ कप
  • तूप – १/२ टेबलस्पून
  • सैंधव मीठ – चवीनुसार
  • हिरवी मिरची – १/२ टेबलस्पून – बारीक तुकडे केलेली
  • जिरे – १ टीस्पून
  • पाणी – १ – १ १/२ कप शिजवण्यासाठी
  • तडका दही साठी –
  • दही – १ कप
  • जिरे – १/४ टीस्पून
  • मिरची – १ टीस्पून
  • आले – १ टीस्पून किसलेले
  • सैंधव मीठ चवीनुसार
  • तूप – १/२ – १ टीस्पून

कृती

  1. वरीचा तांदूळ चांगला धुवून चाळणीने पाणी काढून टाका.
  2. एका टोपात किंवा पॅन मध्ये तूप टाकून त्यात जिरे टाकून तडतडू द्या.
  3. मिरची टाकून २-३ सेकंड ढवळून घ्या.
  4. धुऊन घेतलेला वरीचा तांदूळ आणि मीठ घालून ढवळा.
  5. पाणी टाकून तो ४-५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या. मध्ये मध्ये ढवळत राहा.
  6. थोडा सुकल्यानंतर आणि भात नरम झाल्यावर गॅस बंद करून टाका.
  7. टोपावर झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे तसेच राहू द्या. झाकण काढून थोडावेळ तसाच राहू द्या.
  8. फोडणीच्या दह्यासाठी – एका वाडग्यात दही आणि मीठ चांगले फेटून घ्या.
  9. एका पॅन मध्ये तूप टाकून त्यात जिरे टाकून तडतडू द्या.
  10. त्यात बारीक कापून घेतलेली मिरची आणि किसलेले आले टाकून थोडे परतून घ्या.
  11. केलेला तडका दह्यावर ओता.
  12. गरमा गरम जिरा वरी भाताबरोबर सर्व्ह करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!