
तांदळाची भाकरी हे एक महाराष्ट्रीयन, कोकणातील स्टेपल किंवा प्राथमिक अन्न आहे. विविध राज्यामध्ये भाकरी हि वेगवेगळ्या नावानी ओळखली आणि विविध प्रकारे बनवली जाते.
भाकरी वेगवेगळ्या प्रकारची अन्न धान्ये वापरून बनवली जाते. मुखतः तांदूळ, नाचणी, ज्वारी, बाजरी, मका मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. कोकण किनारपट्टी, महाराष्ट्र मध्ये ह्या धान्याची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात.
तांदूळ धुवून ते कडक उन्हात वाळवून त्याचे पीठ करून त्यापासून बनवलेली भाकरी अतिशय उत्तम आणि चविष्ट बनते. हे तांदूळ थोडे जाडसर दळून आणले कि त्यापासून घावन हि अतिशय चांगले बनते.
भाकरी म्हटली की काही जणांना असे वाटते की किती कठीण आहे किवा करायला जमणारच नाही. पण असे काही नाही थोडीसी टेकनिक वापरुन केली तर फारच सहज रीतीने बनते. मी जर सर्वात आधी कुठली डिश केली असेल तर ती तांदळाची भाकरी ती ही चौथीथ असताना आणि हाताने. ह्या भाकर्या पोळपाट-लाटणे वापरुन ही करता येतात.
उकडीच्या भाकऱ्या तांदळाचे पीठ गरम पाण्यात टाकून किंवा गरम पाणी तांदळाच्या पीठ टाकून हि बनवल्या जातात. खाण्यास अतिशय नरम आणि स्वादिष्ट असा ह्या भाकऱ्या कोणत्याही तिखट करी, भाजी किंवा नुसत्या सुख्या चटण्या बरोबर हि मस्त लागतात.
साहित्य
- तांदळाचे पीठ – १ १/२ कप (चांगल्या दर्जाचे, बासमती किंवा कोणत्याही तांदळाचे किंवा कणीचे पिठ)
- तूप / तेल – 1/2 टेबलस्पून (वैकल्पिक)
- चवीनुसार मीठ
- पाणी – 1 कप किंवा लागेल तसे
कृती
- एक पॅन मध्ये पाणी घेऊन त्यात मीठ आणि तेल घालावे. पाण्याला उकळी येवू द्यावी.
- तांदळाचे पीठ हळूहळू टाकून मिक्स करावे.
- कणिक एकत्र येईपर्यंत व्यवस्तिथ मिक्स करावे. गॅसची फ्लेम कमी ठेवा. कणीक थोडं चिकट असल्यास पिठ घाला आणि चांगले मिक्स करा. गॅस बंद करून पॅन ५ ते ७ मिनीटे झाकून ठेवा.
- हाताला साधे पाणी लावून कणिक थोडी नरम मळून घ्या.
- कणकेचे ८-१० समान गोळे करा.
- एक गोळा घेऊन तो हाताने थोडा दाबून घ्या.
- पोळपाटाला आणि बनवलेल्या भाकरीच्या गोळ्याला थोडेसे सुके पीठ लावून घ्या.
- लाटण्याने हळू हळू लाटून घ्या किंवा हाताच्या बोटानी भाकरी हळू हळू सगळ्या बाजूनी दाबून (४-५ इंच व्यास) चपाती सारखा गोल आकार द्या. लागत असल्यास सुख्या पिठाचा वापर करा.
- आधीच गरम केलेल्या तव्यावर किंवा पॅनवर अलगद टाका. वरून थोडे पाणी लावून घ्या. वर बुडबुडे दिसू लागताच तो परतून घ्या. मध्यम आचेवर भाजून घ्या.
- परत परतून घ्या आणि काही सेकंद भाजू द्या.
- पुन्हा परता आणि दोन्ही बाजूनी व्यवस्तिथ भाजून घ्या. एखादा स्वच्छ कपडा किंवा पलिता वापरून भाकरीच्या कडा दाबून तिला व्यवस्तिथ फुगू द्या. भाकरी फुगली कि ताटात काढून गरमा गरम सर्व्ह करा
टीप
- कणिक मळताना पाण्याची गरज लागत असल्यास गरम पाणी टाकावे. किंवा पीठ जास्त नरम वाटत असल्यास अधिक पीठ वापरावे.