sujataparabrecipes

चटपटीत मखाना

Cuisine: Indian, Course: Snacks/Kid-friendly Diet: Vegetarian

Preparation – 5 Min, Cooking time – 10 Min, Serves – 2 

मखानाला लोटस बिया किंवा फोक्सनट किंवा गॉर्गन नट म्हणून हि ओळखले जाते. ह्या अतिशय पौष्टिक असून त्यात प्रोटीन, व्ही बी आणि खनिजे  मुबलक असतात. फुलवलेल्या मखानाला ‘फुल मखाना’ असे म्हटले जाते आणि विविध प्रकारचे व्यंजन करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. विशेषतः बिहारमध्ये उपवास करताना मखाना खीर हे व्यंजन अतिशय लोकप्रिय आहे. मखाना रक्त दाबाकरणाचे नियमन करण्यास, पचनास मदत करते.

या रेसिपीत मी फुलवलेला माखन हा तूप घालून भाजून घेतला आहे.  मसाला आणि थोडा मीठ घालून सिजनिंग केली आहे. अतिशय स्वादिष्ट, कुरकुरीत, हेलथी आणि कमी मसाले असलेला असा हा मखाना मुले खूप आवडीने खातात.

साहित्य

  • मखाना / फुलवलेल्या कमळ बिया   – १ कप
  • तूप – १/२ टिस्पून
  • एक लहान चिमूटभर मिठ (आपल्या गरजेनुसार कमी जास्त करता येते.)
  • चाट मसाला – १/४ टीस्पून

कृती

  • नॉनस्टीक पॅनमध्ये तूप गरम करा.
  • मखाना टाका. थोडासा कुरकुरीत होईपर्यंत ते भाजून घ्या. कमी आचेवर भाजण्यासाठी 8-10 मिनिटे लागतील.
  • मीठ घाला. चांगले मिक्स करावे
  • एक प्लेट किंवा वाडग्यात काढा. चॅट मसाला टाकून चांगले ढवळून किंवा टॉस करून घ्या.
  • सर्व्ह करा किंवा मुलांना डब्यात भरून द्या.

टीप

विविध मसाल्याचा किंवा हर्ब्सचा वापर करून वेगवेगळ्या फ्लेवरच्या मखाना डिशेस बनवता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!