
Cuisine: Indian, Course: Hot beverage, Diet: Vegetarian
Preparation – 5 Min , Cooking time -20 minutes , Serves – 2-3
गवती चहा हा गवता सारखे वाढणारे रोप असते. म्हणूनच त्याला महाराष्ट्रात गवती चहा असे म्हणतात. ह्या गवताच्या पातीला एक विशिष्ट असा सुगंध असतो. भारतात प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या राज्यांत गवती चहा जास्त प्रमाणात आढळतो.
महाराष्ट्रत कोकण पट्टयात ह्याची रोपे बहुतेक घरी, अंगणात किवा परसामध्ये आढळतात. सकाळचा गरम वाफाळता चहा, चहाची पात आणि आले घालूनच केला जातो. पातीला सुगंध असल्या कारणाने चहाला एक वेगळीच, रीफ्रेशिंग चव येते.
गवती चहा हे सर्दी, खोकला निद्रानाश उपचार मदत करते. आले पुन्हा खोकला, सर्दी यासाठी खूप चांगले आहे आणि पचनास मदत करते, मळमळ थांबवते.
गवती पात आणि आल्याची चहा हा महाराष्ट्रात नियमितपणे केला जातो आणि घेतला जातो.
साहित्य
- गवती चहाच्या पाती – 2-3 (लहान जुडी करून बांधून घ्या किवा कापून घ्या).
- ताजे आले बारीक चिरून किंवा बारीक कापलेले – ½ इंच किंवा 1 टेस्पून
- साखर – ३ टेबलस्पून (तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा)
- काळी चहा पावडर – २ टीस्पून
- दूध – १/२ – ३/४ कप
- पाणी २ वाट्या
कृती
- गवती चहाच्या पाती आणि आले चांगले धुवून घ्या. एक लहान जुडी करून बांधून घ्या.


- आल्याचे बारीक तुकडे करा किंवा जाडसर कुटून घ्या.


- केटलमध्ये किवा टोपात पाणी गरम करा. आले आणि गवती चहाची जुडी घाला.

- मंद आचेवर १० मिनिटे मिश्रण चांगले उकळवा. जेणे करून गवती चहाचा आणि आल्याचा फ्लावर पाण्यात उतरेल.

- चहा पावडर आणि साखर घालून मंद आचेवर ७-८ मिनिटे उकळवा.

- दूध घाला. ३-४ मिनिटे उकळून घ्या. गाळून गरमागरम सर्व्ह करा.

टीप –
- गवती चहा आणि आले पाण्यात किमान १०-१२ मिनिटे उकळणे आवश्यक आहे.