sujataparabrecipes

Cuisine: Indian, Course: snack/kids friendly, Diet: Vegetarian

Preparation – 5 Min, Cooking time – 10-13 Min, Serves –4

ही एक अतिशय सोपी रेसिपी आहे. कमी वेळ आणि कमी साहित्य लागते. लहानानपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी अशी ही रेसिपी अतिशय चवदार आणि मजेशीर आहे.

साहित्य

  • काजू – १/२ कप
  • कोमट पाणी – 1/2 टेबलस्पून
  • तेल – ½ टेबलस्पून
  • मीठ – 3/4 टीस्पून

कृती

  • कोमट पाण्यात मीठ घाला. ते विरघळू द्या.
  • एका मोठ्या भांड्यात काजू घ्या. हे पाणी घाला. सर्व काजू मिठाच्या पाण्याने चांगल्या रीतीने कोट होईपर्यंत मिसळा.
  • ओव्हन 160 डिग्री सेल्सिअस वर गरम/प्रीहीट करा.
  • बेकिंग ट्रेवर काजू एका थरात ठेवा. थोडे मीठ शिंपडा.
  • प्री-हीटेड ओव्हनमध्ये 10 मिनिटे काजू बेक करावे. 3 -4 मिनिटांनंतर तपासून पहा. अधून मधून बाहेर काढून चेक करावे. नाहीतर काजू जळण्याची शक्यता असते.
  • 10 मिनिटांनी बाहेर काढा आणि थोडे तेल शिंपडा. चांगले कोट करा. जास्तीचे मीठ असल्यास काढून टाका.
  • पुन्हा 2-3 मिनिटे किंवा हलका तपकिरी होईपर्यंत बेक करावे.
  • थंड करून हवाबंद डब्यात साठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!