
खरबुज पुडिंग हे काजू बदाम पेस्ट, खरबूज, सब्जाआणि दूध ह्यापासून बनलेले आहे. काजू आणि बदाम ह्या डिश ला एक वेगळी चव आणि रिचनेस देतात. हे थंड्गारच सर्व्ह करावे.
- Preparation Time
20 minutes - Chilling
2 hours - Serves
4 adults - Difficulty
Easy
साहित्य
- खरबूज – १ कप बारीक काप केलेले आणि थंड (व्यवस्तीत पिकलेला)
- थंड दूध –१ – १ १/२ कप
- साखर – २ टेबलस्पून
- काजू – ८-९
- बदाम – ८-९ सोलून बारीक कापलेले (ब्लांचड)
- सजावटीसाठी – थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे , चेरीस, काजू – बदाम बारीक कापलेले
कृती
- मिक्सर मध्ये काजू आणि बदाम वाटून घ्या.
- त्यात थंडगार खरबुजाचे काप, साखर, थंडगार दूध, एकत्र करून प्युरी करून घ्या.
- वाडग्यात काढून घ्या.
- सब्जा २ टेबलस्पून पाण्यात घालून ५ मिनिटांसाठी फुलण्यासाठी भिजवून ठेवा. थोड्या वेळाने त्या पारदर्शक आणि आकाराने दुप्पट होतील.
- फुगलेल्या सब्जा किंवा चिआ सीड्स मिक्स करून घ्या.
- थोडे थंडगार खरबुजाचे अतिशय बारीक तुकडे, चेरीस, काजू – बदाम बारीक कापलेले टाकून थंडगार सर्व्ह करा.
